मुंबई : आता थंडी संपत आली आहे उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे महिलांबरोबर पुरूषांनी देखील आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्याची आवश्यक्ता आहे. आता सनस्क्रीनचा नियमित वापर करा. निरोगी त्वचेकरिता सनस्क्रीनचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. उन्हाळ्याच्या वेळी दर तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. कधीही सनस्क्रीनशिवाय बाहेर पडण्याची चूक करू नका. सनस्क्रीनचा वापर हा अकाली वृद्धत्वापासून नक्कीच संरक्षण करेल. (This is how men should take care of their skin in summer)
घरातून बाहेर पडताना आणि घरात परत आल्यानंतर अगोदर आपला चेहरा फेस वॉशने धुवा. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावरील घाण दूर होण्यास मदत होईल, तसेच आठवड्यातून एकदा आपल्या चेहरा स्क्रब करा. बऱ्याच पुरूषांना ठेवण्याची सवय असते. त्यांनी दाढी स्वच्छ ठेवावी. तसेच कोरफड आणि नारळ तेल यासारख्या गोष्टींद्वारे मॉइश्चरायझिंग करा.
-उन्हाळ्यामध्ये बॉडीवॉश वापरले पाहिजे जे आपल्या त्वचेची पीएच पातळी योग्य ठेवू शकेल. यासाठी जर तुम्ही लिंबूयुक्त बॉडीवॉश वापरला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर आपण साबण वापरत असाल तर तुम्ही आंघोळीच्या शेवटी लिंबाचे रस थोडा पाण्याच मिसळून अंघोळ केली तरी घामाचा वास तुमच्या शरीरातून येणार नाही.
-घर सोडण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन वापरा आणि फक्त आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन लावा. या व्यतिरिक्त आपण याचा उपयोग आपल्या हात व पायांच्या खुल्या भागांवर देखील करू शकतो. हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपली त्वचा संरक्षित करेल. यामुळे चेहरा आणि हात पायांच्या त्वचेला सनबर्न आणि टॅनिंगसारख्या समस्यांपासून संरक्षण मिळेल आणि त्वचेला नुकसान होण्याचा धोका होणार नाही.
-आपल्या त्वचेला फक्त हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यात देखील मॉइश्चरायझरची आवश्यकता असते. उन्हाळ्यातही त्वचा कोरडी व निर्जीव होते, त्वचेला मॉइश्चरायझेशन करणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच, रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर दररोज वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून त्वचा ओलसर राहील.
– उन्हाळ्यात त्वचेबरोबरच केसांचीही काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये डोक्याच्या त्वचेवरही भरपूर घाम फुटतो, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात आणि केस गळण्याची समस्या उद्भवते. यासह कोंडाची समस्याही वाढते. हे टाळण्यासाठी, दररोज शैम्पूने आपले डोके धुवा. आपण इच्छित असल्यास आपण बेबी शैम्पू देखील वापरू शकता.
संबंधित बातम्या :
Broccoli Benefits | हिवाळ्यात ब्रोकोली खाण्याचे प्रचंड फायदे, अनेक आजारांत ठरेल लाभदायी!#Broccoli | #HealthBenefits | #Goodfood | #health https://t.co/VXhhIBEKnq
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2021
(This is how men should take care of their skin in summer)