मुंबई : जगभरात मधुमेह सारखा गंभीर आजार आता सामान्य होत चालला आहे. स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करत नसल्यामुळे रक्त प्रवाहात साखर तयार होते. मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह. दोघांमध्ये टाईप २ मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. मधुमेह झाला असेल तर काही लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं दिसताच मधुमेह तपासला पाहिजे. काय आहेत ती मधुमेहाची सामान्य लक्षणे जाणून घेऊया.
जर अंधुक दिसू लागले असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. त्यावेळी डोळ्यांना स्पष्ट दिसत नाही.
इंसुलिन हे रक्तातून आणि पेशींमध्ये ग्लुकोज नेण्यासाठी जबाबदार हार्मोन आहे आणि मधुमेह असलेले लोक एकतर पुरेसे इंसुलिन तयार करू शकत नाहीत किंवा त्यास प्रतिरोधक असतात. मधुमेहामुळे उच्च रक्तातील साखरेची पातळी स्पष्ट दिसण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यातील लेन्समध्ये सूज असू शकते.
रक्तातील साखरेचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे स्पष्ट दिसत नाही. परंतु साखरेची पातळी स्थिर झाल्यावर किंवा सामान्य श्रेणीत परत येताच, दृष्टी सामान्य झाली पाहिजे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, अशीच एक समस्या म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी, जी आता कार्यरत वयातील प्रौढांमध्ये अंधत्व येण्याचे प्रमुख कारण आहे.
अचानक अस्पष्ट दिसू लागल्यास, शक्य तितक्या लवकर तुमचे डोळे तपासण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची भेट घ्या. पण काळजी करण्यासारखे काही नाही. खराब दृष्टी हे मोतीबिंदू, मायग्रेन आणि वय-संबंधित डोळ्यांच्या समस्यांचे कारण असू शकते.