मसाला डोसा खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा हा झटपट बनणारा पोहे चीला

| Updated on: Dec 14, 2024 | 3:48 PM

दररोज एकाच प्रकारचा नाश्ता केल्याने आपल्याला कंटाळा येतो. यामुळे नाष्ट्यामध्ये रोज काहीतरी नवीन खावेसे वाटते. तुम्हाला ही रोज सकाळी नाश्त्यात काही वेगळे पदार्थ ट्राय करायचे असतील तर जाणून घ्या अशीच एक सोपी रेसिपी.

मसाला डोसा खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा हा झटपट बनणारा पोहे चीला
पोहा चिला
Follow us on

सकाळची सुरुवात सकस आणि चविष्ट नाश्त्याने जर झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. म्हणूनच भारतामध्ये सकाळच्या वेळेला चांगला नाश्ता केला जातो. सकाळी वेगवेगळे पदार्थही बनवले जातात विशेषतः भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता तयार केला जातो. जसे उत्तर प्रदेशात पुरी भाजी दक्षिणेत इडली आणि डोसा मध्य प्रदेशात पोहे पंजाब मध्ये बटाटा पराठा मुंबईत वडापाव आणि पावभाजी नाष्ट्यासाठी बनवली जाते. परंतु एखादा पदार्थ आता फक्त शहरासाठी मर्यादित राहिला नसून तर संपूर्ण भारतात तयार केले जातो. डोसा हा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय आरोग्यदायी आणि उत्तम पर्याय आहे. तुम्हाला सकाळच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही काहीतरी नवीन ट्राय करून पाहू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही पोहे चीला बनवू शकता. हा सकाळचा निरोगी आणि चवदार नाष्टा ठरेल जो तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. या मधून तुम्हाला अनेक प्रकारचे पोषक घटक मिळतील. तसेच त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्वे आहेत. पोहे चील्याची चवही अप्रतिम आहे. त्यामुळे तुम्ही एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल.

पोहे चीला हा आरोग्यदायी नाश्ता मानला जातो. वजन कमी करण्यासाठी हा नाश्त्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. जाणून घेऊया पोहे चिले बनवण्याची रेसिपी.

साहित्य

हे सुद्धा वाचा

एक पोहे
अर्धा कप दही
एक कप चिरलेला कांदा
अर्धा कप चिरलेले गाजर
कोथिंबीर
एक ते दोन हिरव्या मिरच्या
एक चमचा किसलेले आले
एक टीस्पून हळद
एक टीस्पून लाल मिरची पावडर
एक टीस्पून धने पावडर
मीठ चवीनुसार

कृती

सर्वप्रथम पोहे नीट धुवून 15 मिनिटे भिजु द्या. यानंतर पोहे पिळून घ्या. एका मोठ्या भांड्यात पोहे, कांदा, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले आणि सर्व मसाले एकत्र करा. यानंतर तव्यावर थोडे तेल टाकून तयार केलेले पीठ पसरवा. दोन्ही बाजूने हे कुरकुरीत होईपर्यंत त्याला चांगले भाजून घ्या. यानंतर टोमॅटो चटणी किंवा हिरव्या पुदिन्याच्या चटणी सोबत गरमागरम खा.