रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक आजारांवर ‘करवंद’ गुणकारी !

| Updated on: May 05, 2021 | 6:59 AM

उन्हाळ्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यामध्येही सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागणार आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक आजारांवर करवंद गुणकारी !
करवंद
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. त्यामध्येही सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हेल्दी आहार, व्यायाम आणि जास्त पाणी पिणे फायदेशीर आहे. कारण कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात असे काही फळे मिळतात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (To boost the immune system Carissa spinarum beneficial)

अशाच एका फळाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. करवंदमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवते. करवंदमध्ये असे काही घटक असतात. त्यामुळे अनेक आजार हे आपल्याापासून दूर राहतात. यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात जास्तीत-जास्त करवंद खा. करवंद फक्त रोगप्रतिाकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत.

श्वसन समस्या
करवंद खाल्ल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीबरोबरच श्वसनाची समस्या देखील दूर होते. जर आपण करवंदचा रस दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर श्वसनाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. जर आपण करवंदच्या रसात लिंबाचा आणि आल्याचा रस मिसळला तर ते आणखीन फायदेशीर होईल.

अशक्तपणा
करवंदमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस इत्यादी खनिजे असतात जे आपल्या शरीराची कमकुवतपणा काढून स्नायूंना बळकट करतात.

सांधेदुखी
ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. अशांनी करवंदाचे सेवन केले पाहिजे. तसेच आपले पाय खूप दुखत असतील तर त्याठिकाणी करवंदाचे पाने चोळा यामुळे काही मिनिटांमध्येच आराम मिळेल.

पित्ताची समस्या
पित्ताशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही करवंद खूप प्रभावी आहे. याशिवाय हे नियमित सेवन केल्याने किंवा रस पिल्याने पाचन तंत्र सुधारते आणि गॅस, आंबटपणा, अपचन यासंबंधातील समस्या दूर होतात.

बीपी-कोलेस्ट्रॉल
करवंदमधील असलेले खनिज रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. याशिवाय अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. हे हेमोग्लोबिन खूप वेगाने वाढवण्याचे काम करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(To boost the immune system Carissa spinarum beneficial)