हो खरयं… आता वेळ आलीयं ‘मास्क फ्री’ जगण्याची… काय आहे नेमका दावा…

| Updated on: Feb 15, 2022 | 12:44 PM

आरोग्य धोरण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ कॅन्सर सर्जन डॉ. अंशुमन कुमार यांच्या मते, आता देशाला ‘मास्क मुक्त’ करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेली तिसरी लाट अत्यंत सौम्य होती. यात, कोरोना जीवघेणा ठरला नाही.

हो खरयं... आता वेळ आलीयं ‘मास्क फ्री’ जगण्याची... काय आहे नेमका दावा...
मास्क
Follow us on

कोरोनाच्या सुरुवातीपासून हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्कचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत होता. पहिली व दुसरी कोरोनाची (Corona virus)लाट अत्यंत घातक होती. त्यानंतर आलेली तिसरी लाट सौम्य होती. यामुळेच कोरोनाला आता हद्दपार करण्याची योग्य वेळ असल्याचे सांगितले जात होते. अनेकांच्या मते ज्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झालाय त्याच्यात कोरोनाविरुध्द लढण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण होत आहे. अशा प्रकारे अनेकांनी हर्ड इम्यूनिटी (Immunity) म्हणजे समुह संसर्गापासून तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीचाही सिध्दांत मांडला आहे. यातूनच आता सर्वांनी मास्क फ्री (Remove mask) व्हायला हवे असादेखील एक विचारप्रवाह निर्माण झाला आहे. सध्या जगभरात कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. ब्रिटनमध्ये मास्क घालण्याची अट रद्द करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या देशातही मास्क घालणे बंद करायचे का, असा मोठा प्रश्न निर्माण होतो. आगामी काळात कोरोना हा एक सामान्य आजार होईल का? याबाबत आरोग्य तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.

नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल

ज्येष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अंशुमन कुमार म्हणाले की, देश मास्क मुक्त करण्याची वेळ आली आहे. ज्यांना अद्याप कोरोना झाला नाही त्यांना याचा फायदा होईल. अशा लोकांना संसर्ग होईल आणि त्यांच्यात प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण होईल. ज्या लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे त्यांना अजूनही सौम्य लक्षणे असतील. यामुळे पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतील आणि त्यांना धोका होणार नाही. जेव्हा सर्व लोकांना संसर्ग होईल तेव्हा देशभरात कोरोनाविरूद्ध अँटीबॉडीज तयार होतील. जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणून काम करेल. आगामी काळात धोकादायक प्रकार आला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

…तर कोरोना सामान्य आजार

भारतात डेल्टामुळे दुसरी लाट आली होती. त्यानंतर ओमिक्रॉन प्रकार आला परंतु त्याचा प्रभाव अतिशय कमी होता. यात मृत्यूदरदेखील खूप कमी होता. लोकांना सामान्य खोकला आणि सर्दीची लक्षणे दिसत होती. ज्यांनी एकतर लस घेतली नाही किंवा जे वयोवृद्ध आणि काही गंभीर आजाराने त्रस्त होते अशा लोकांनाच रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली होती. इतरांना घरातच उपचार देत बरे करण्यात आले होते. आता ओमिक्रॉन नंतर कोरोना अगदी सामान्य फ्लूसारखा म्हणायला हरकत नसल्याचे मत निर्माण झाले आहे. नवीन कुठलाही व्हेरिएंट आला नाही तर कोरोना एका सामान्य आजारासारखा राहणार असल्याचे मत डॉ. कुमार यांनी व्यक्त केले आहे. मास्क मुक्त झाल्यानंतर विषाणूचा प्रसार होईल, ज्यामुळे वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्यांना धोका होऊ शकतो का, याबाबत डॉ. अंशुमन म्हणाले की, या लाटेत वृद्ध आणि इतर गंभीर आजार असलेल्या लोकांनाही मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. अशा परिस्थितीत, आगामी काळात त्यांना कोरोना झाला तरी, त्यांच्यात लक्षणे गंभीर नसतील. कोरोनाची लागण होण्याचा धोका नसला तरी त्यांना विषाणूचा अधिक गंभीर संसर्ग नसावा, अशा लोकांना आपल्याला कोरोना होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाण्याने संसर्ग झाल्यास शरीरात विषाणूंचा प्रभाव अधिक असू शकतो. त्यामुळे वृद्धांनी जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागेल.

या गोष्टी कराव्याच लागतील

मास्क फ्री व्हावे म्हणजे कोरोना नियमांतून सूट मिळते असे नाही, मास्क काढल्यानंतरही शारीरिक अंतर आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते. हे नियम आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून पाळले पाहिजेत. असे केल्याने, टीबी, व्हायरल इन्फेक्शन आणि इन्फ्लूएंझा यांसारख्या इतर संसर्गजन्य रोगांपासूनही संरक्षण मिळेल, असे डॉ. कुमार यांनी सांगितले आहे.

(टीप : हा लेख अभिषेक पांचाळ यांनी डॉ. अंशुमन कुमार यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आधारे तयार केला आहे, याला कुठलाही सल्ला किंवा सक्ती समजू नये, कोरोनापासून लांब राहण्यासाठी शासकीय नियमांची अंमलबजावणी करावी.)

संबंधित बातम्या :

ही चार लक्षणे जी सांगतील मुलांना चष्मा लागण्याची चिन्हे

कोलेस्ट्रॉल वाढल्याच्या खुणा डोळ्यांवरही दिसतात? जाणून घ्या लक्षणं

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा