मुंबई : लठ्ठपणा आता एक मोठी समस्या झाली आहे. अनेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. कोणी जिमला जाते तर कोणी लठ्ठपणा कमी करण्यासाठी गोळ्या घेतात. मात्र, आता असे काही करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे जिमला न जाता आणि कुठल्याही गोळ्याचे सेवन न करता तुम्ही वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे एका आठवड्यात तुमचे वजन कमी होईल. (To lose weight Follow these tips)
-जर तुम्हाला एका आठवड्यात वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला रोजचा नित्यक्रम बदलावा लागेल. आपल्याला खाण्याची सवय बदलावी लागेल. ज्या खाद्यपदार्थमध्ये जास्त साखर आणि कॅलरी असतात अशा प्रकारचे खाद्यपदार्थ टाळावेत. आपल्या आहारात तळलेले पदार्थ, गोड पेय, केक, कुकीज, कपकेक्स, ब्रेड, पेस्ट्री, स्नॅक फूड, फ्रेंच फ्राई, बटाटा हे सर्व टाळावे या सर्वांमध्ये चरबी जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
-आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दररोज चालण्याची सवय लावावी लागणार आहे. त्यामध्ये ही फास्ट चालण्याची सवय लावावी यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. जिममध्ये न जाता केवळ चालून आपण आपले 9 किलो वजन कमी करू शकतो. दररोज शक्य असेल तेवढे जास्त चला जर तुम्ही यासर्व गोष्टी फाॅलो केले तर तुमचे वजन एका आठवड्यातच कमी होईल.
-वजन वाढल्यानंतर आपल्याला अनेकांकडून ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे ग्रीन टी हे पाण्यानंतर जगभरातील सर्वात प्रसिद्ध पेय पदार्थ बनलं आहे. ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे शरीरातील वाढलेले वजन आटोक्यात येते आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते.
संबंधित बातम्या :
फॅट टू फिट… मुंबईतील 132 किलो ‘वजनदार’ महिला कॉन्स्टेबलचा प्रवास
तुम्ही अंडी खाण्याचे शौकीन आहात? मग ही बातमी वाचा https://t.co/RvhTrYfMm4 @GoodEggs #eggs #eggschoice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
(To lose weight Follow these tips)