मुंबई : दही खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. (To lose weight Mix Badishep Powder in curd and eat)
विशेष म्हणजे दह्याचा आहारात समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्या असलेल्या कोरोनामुळे आपल्याला व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडणे देखील शक्य होत नाहीये. यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवत वजन कमी करणे गरजेचे झाले आहे. आज आम्ही तुम्हाला खास पदार्थ सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजनही कमी होईल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत देखील होईल. दह्यामध्ये आपण बडीशेपचे पावडर मिक्स करून खाणे.
यामुळे वजन झपाट्याने कमी होईल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. याशिवाय आपण दह्यामध्ये काळी मिरीची पावडर मिक्स करून खाणे. यामुळे देखील आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतील. बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत.
बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. म्हणूनच बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यात असलेल्या अॅस्ट्रॅगल आणि अॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते. मसालेदार जेवणामुळे होणारी जळजळ आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी बडीशेप प्रभावीपणे कार्य करते.
संबंधित बातम्या :
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(To lose weight Mix Badishep Powder in curd and eat)