तुमच्या शरीरातील लठ्ठपणा (obesity) वाढत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. लठ्ठपणामुळे हृदयरोगाचा (heart disease) धोका वाढतो. त्यामुळे बीएमआय जास्त असेल तर शरीरातील लठ्ठपणा कमी होणे महत्वाचे आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, वजन वाढल्यामुळे शरीराचे नुकसान होते. लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आणि रक्ताशी संबंधित आजारही (health problems) होऊ शकतात.
या संशोधनात असे नमूद करण्यात आले आहे की, बॉडी फॅट मुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. ज्या लोकांना अनुवांशिक हृदयरोग आहे त्यांना लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. मात्र जीवनशैली सुधारून लठ्ठपणाची समस्या कमी करता येते. मात्र त्यासाठी आहारात प्रोटीन आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करणे गरजेचे आहे. फॅट्सयुक्त पदार्थ आणि जंक फूडचे सेवन कमी करा. तसेच जेवणात मीठ, मैदा आणि साखर यांचा कमीत कमी वापर करावा. दररोज, नियमितपणे अर्धा तास व्यायाम करावा.
एवढे वजन आहे धोकादायक –
फिजीशिअन डॉ. कवलजीत सिंग यांच्या सांगण्यानुसार, पुरुषांमध्ये बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) 22 च्या वर गेला असेल तर ती समस्या मानली जाते. बीएमआय 25 ते 30 दरम्यान असेल तर त्याचा अर्थ असा होतो, की त्या व्यक्तीचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे. तर 30 पेक्षा जास्त बीएमआय असणे ही लठ्ठपणाची समस्या मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीचा बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल तर हृदयरोगाचा धोका वाढतो. जे लोक लठ्ठ आहेत, तसेच मद्यपान व धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या सांगण्यानुसार, लठ्ठपणा असलेल्या 10 टक्के लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल असते. जे हृदयविकाराचा झटका येण्याचे एक प्रमुख कारण बनू शकते. तसेच लठ्ठपणामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचीही शक्यता असते. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. बऱ्याच वेळा व्यक्तीला अचानक दम लागण्याचा त्रासही होतो.
लठ्ठपणामुळे अस्थमा, टाइप-2 मधुमेह यांचाही धोका असतो. टाइप-2 मधुमेहामुळेही हृदयरोगही वाढतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, व्यक्तींना मधुमेह व लठ्ठपणाची समस्या एकत्र होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत, लोकांनी लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करणे अतिशय महत्वाचे आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा –
– बीएमआय 30 पेक्षा अधिक असेल तर वजन कमी करावे
– रोज कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे
– बाहेरचे पदार्थ, जंक फूड खाणं टाळावं
– झोपेची पद्धत योग्य ठेवा, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे.