आता झोपा काढा आणि पैसा कमवा, या 5 जॉबची भन्नाट ऑफर; काय आहे फंडा?
प्रत्येकाला आरामदायी नोकरी हवी असते आणि दर महिन्याला खात्यात 6 अंकी मोठा पगार क्रेडिट व्हावा असे वाटत असते. जर तुम्हाला सांगितले की तुम्हाला झोपण्याचे पैसे दिले जातील तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल का? होय, यूकेची लक्झरी बेड कंपनी क्राफ्टेड बेड्स बेडवर झोपण्यासाठी नोकरी देऊ करत आहे, ज्याच्या बदल्यात नोकरी करणाऱ्याला 25 लाख रुपये पगार दिला जाईल.