स्वस्त फिरा मस्त राहा आनंदी जगा , आशिया खंडातील सर्वात स्वस्त 5 देश
आशिया खंड हे प्रचंड पर्वत, जंगले, वाळवंट, समुद्रकिनारे, तलाव,तेथील अन्न आणि विविध भाषांचे बेट मानले जाते. येथील पर्यटन प्रत्येकाला आकर्षित करते. तुम्हालाही कमी बजेटमध्ये पर्यटन करायचे असेल, चला तर मग जाणून घेवूयात आशिया खंडातील सर्वात स्वस्त देश.
1 / 5
व्हिएतनाम हा आशियातील सर्वात स्वस्त देशांपैकी एक प्रमुख देश आहे. व्हिएतनाम हा अलीकडच्या काळात तरुणांमध्ये सर्वाधिक पसंतीचा देश बनला आहे. व्हिएतनाममध्ये प्रवासाच्या सुविधांपासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही स्वस्त आहे. व्हिएतनामला जाण्याचा उत्तम काळ म्हणजे थंडीचा हंगाम. म्हणजेच ऑक्टोबर ते एप्रिल हा काळ. या महिन्यात तिथे कमी पाऊस कमी पडतो. जानेवारीच्या शेवटी तेथे टेट उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील. त्याच प्रमाणे व्हिएतनामची संस्कृती जवळून अनुभवता येईल. व्हिएतनाम मध्ये तुम्ही हा-लाँग बे, व्हिएतनामची राजधानी असलेली हॅनोई शहर , थांग लाँग इम्पीरियल सिटी या गोष्टी पाहू शकता. व्हिएतनामचे चलन व्हिएतनामी डोंग आहे परंतु सामान्यत: डॉलर आणि युरो स्वीकारले जातात. काही आस्थापनांमध्ये ते क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या कोणत्याही ऑपरेशनमध्ये अधिभार जोडतात पण ग्रामीण भागात ते केवळ रोख रक्कमेनेच व्यवहार होतात.
2 / 5
मलेशिया देश आशियाच्या आग्नेय भागात स्थित एक नेत्रदीपक पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये भरपूर फिरू शकता. हे सर्वात जास्त भेट दिलेले ठिकाण मानले जाते. इथेही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील. तुम्हालाही परदेश प्रवासाची आवड असेल, तर मलेशियाची सहल तुमच्या बजेटमध्ये बसेल.थायलंड जाण्यासाठी व्हिसाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे भारतातून प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी व्हिसा मिळवता येतो आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑन अरायव्हल व्हिसा. १५ दिवसांपेक्षा जास्त राहाणार नसाल तर ऑन अरायवल व्हिसा सोयीचा ठरतो. तेथे असणारा नयनरम्य ठिकाणे तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातील.
3 / 5
नेपाळ हे आशियातील सर्वात स्वस्त ठिकाणांपैकी एक आहे. नेपाळ पूर्णपणे भारतात मिसळला आहे. भारतातील लोकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. नेपाळमध्ये पर्यटकांना इतर देशांच्या तुलनेत अतिशय स्वस्त दरात राहण्यासाठी हॉटेल्स मिळतात. प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत, तुम्ही एकदा अवश्य भेट द्यावी.
4 / 5
आशियातील सर्वात स्वस्त देशांच्या यादीत भारताचे नाव देखील समाविष्ट आहे. भारतात प्रत्येक रंग दिसतो. हवामानापासून ते खाद्यपदार्थ, ऐतिहासिक सौंदर्य, सर्व काही पर्यटकांना सुखावणारे आहे. भारतात भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. भारतातील ताजमहाल, लाल किल्ला आणि बुलंद दरवाजा यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. भारताच्या कोणत्याही भागात गेल्या नंतर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल.
5 / 5
या यादीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया हा सुंदर देश. इंडोनेशियात एका व्यक्तीसाठी एक महिनाभर राहण्याचा खर्च फक्त जवळपास 25,000 रुपये इतकाच आहे. आग्नेय आशियातील या देशाच्या एक बाजूला हिंद महासागर आहे तर दुसऱ्या बाजूला पॅसिफिक महासागर. इंडोनेशिया तब्बल १७,००० बेटांचा मिळून बनलेला देश आहे. हा जगातील सर्वात मोठा बेट असलेला देश आहे. २६.४ कोटी लोकसंख्येसह हा जगातील चौथ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. इंडोनेशियामध्ये बाली, जकार्ता आणि इतर अनेक शहरे आहेत ज्यात राहण्याचा खर्च हा जगातील महत्त्वाच्या शहरांपेक्षा खूपच कमी आहे.