छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात हे 5 किल्ले; एकदा आलात तर परत जावसंच वाटणार नाही

| Updated on: Nov 27, 2024 | 11:42 AM

महाराष्ट्राचे किल्ले फक्त भौगोलिक स्थळे नाहीत तर महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार आहेत. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे किल्ले, आपल्या वास्तुकलेने आणि ऐतिहासिक महत्त्वाने पर्यटकांना मोहित करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात हे 5 किल्ले; एकदा आलात तर परत जावसंच वाटणार नाही
Follow us on

महाराष्ट्राला प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. महाराष्ट्र ही कर्तबगार राजांची भूमी आहे. तसेच महाराष्ट्र ही ज्ञान तपस्वींचीही भूमी आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचे अलौकिक महापुरुष झाले. त्यांची किर्ती आजही जगभर गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढा जाणून घेऊ तितका तो कमी वाटतो, इतकी महाराष्ट्राची जनता शिवाजी महाराजांशी एकरूप आहे. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे. तुम्ही जर महाराष्ट्रात आला तर शिवाजी महाराजांचे किल्ले आवर्जून पाहा. हे किल्ले पाहिल्याने तुम्हाला वास्तू कलेचा अद्भूत चमत्कार तर पाहायला मिळेलच, पण एका युगात आल्याचा भासही होईल.

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला पुण्याचा सर्वात उंच किल्ला आहे. या किल्ल्याला प्रचंडगड म्हणूनही ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी हा किल्ला जिंकला. त्यांचा हा सर्वात पहिला विजय होता. या किल्ल्याची वास्तुकला अत्यंत खास आहे. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. या किल्ल्यात जुने मंदिरे, पाण्याचे कुंड आणि प्राचीन भिंती आहेत. तसेच, ज्या लोकांना ट्रॅकिंग करायला आवडते, ते व्हेले गावापासून किल्ल्यापर्यंत ट्रॅक करत सहज पोहोचू शकतात.

विजयदुर्ग किल्ला

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर विजयदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला वास्तुकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर असल्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढते. जर तुम्हाला अरबी समुद्राचे दृश्य पाहायचे असेल, तर एखाद्या महागड्या रिसॉर्टपेक्षा इथे येऊ शकता. किल्ल्याचे बांधकाम 12व्या शतकात करण्यात आले होते, आणि 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकून त्याचे नामकरण विजयदुर्ग (यानी ‘विजयाचा किल्ला’) केले, असं सांगितलं जातं. या किल्ल्याची समुद्री भिंती आणि मजबूत किल्लेप्रहरासाठी प्रसिद्ध आहे.

प्रतापगड किल्ला

मराठ्यांचा इतिहास प्रतापगड किल्ल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. महाबळेश्वरपासून 24 किलोमीटर दूर असलेला हा किल्ला इतिहासाचा साक्षीदार आहे. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात प्रसिद्ध प्रतापगड येथे लढाई झाली होती. यावेळी शिवाजी महाराजाने अफजल खानाचा कोथळा काढला होता. थंडीच्या मोसमात किल्ल्याचे सौंदर्य अधिक खुलते. हलक्या धुंद आणि गुलाबी थंडीच्या वातावरणात तुम्ही किल्ल्यापर्यंत ट्रॅकिंग करू शकता.

सिंधुदुर्ग किल्ला

अरबी समुद्राने घेरलेला सिंधुदुर्ग किल्ला वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. किल्ल्याचे बांधकाम 1664 ते 1667 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. खास गोष्ट म्हणजे किल्ला बेसाल्ट दगडांनी बनवलेला आहे, ज्याच्यासमोर समुद्राच्या लाटा देखील नतमस्तक होतात. हा किल्ला आजही तितक्याच ताकदीने उभा आहे. त्या काळी या किल्ल्यावर विजय प्राप्त करणे अशक्य मानले जात होते. किल्ल्याच्या आजुबाजूला अनेक छोटे किल्ले आहेत, जिथे शिवाजी महाराजांची सेना राहात होती.

हरिशचंद्रगड किल्ला

हरिशचंद्रगड किल्ला महाराष्ट्राच्या सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे, ज्याचे निर्माण 6व्या शतकात केले गेले होते. हा किल्ला व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता, म्हणूनच अनेक राजांनी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वात प्रसिद्ध युद्ध मराठे आणि मुघल दरम्यानच झाले होते. या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी कुठला पक्का रस्ता नाही. जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला ट्रेल्स जुन्नर गेट-नालीची वॉटमार्गे जाऊनच यावे लागेल. हा ट्रॅकिंग रस्ता घनदाट जंगल आणि खराब रस्त्यांमधून जातो. किल्ल्यापर्यंत पोहोचणं खूप कठिण आहे. पण एकदा इथे आलात की, तुम्ही परत जाण्याचा विचारही करणार नाही. किल्ल्याजवळ असलेलं केदारेश्वर मंदिर आणि पुष्करिणी (एक औषधीय गुण असलेली पाणी कुंड) पाहण्यास विसरू नका.