Go First ची ‘फ्रीडम ऑफर’ सुरू, फ्री सीट सिलेक्शनसह मोफत भोजनाचीही सुविधा

| Updated on: Jul 27, 2022 | 4:53 PM

Go First एअरलाइनने सुरू केलेल्या फ्रीडम ऑफरचा बूकिंग कालावधी 30 ऑगस्ट पर्यंत आहे. या कालावधीत बुकिंग झालेल्या तिकीटावर 25 जुलै 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रवास करता येणार असून फ्री सीट सिलेक्शनची सुविधा उपलब्ध आहे.

Go First ची ‘फ्रीडम ऑफर’ सुरू, फ्री सीट सिलेक्शनसह मोफत भोजनाचीही सुविधा
Go First ची ‘फ्रीडम ऑफर’ सुरू, फ्री सीट सिलेक्शनसह मोफत भोजनाचीही सुविधा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘गो फर्स्ट‘ (Go First Airline) या विमान कंपनीने खास ऑफर जाहीर केली आहे. फ्रीडम ऑफर (Freedom Offer) असे त्याचे नाव असून त्या अंतर्गत तिकीट बूक करणाऱ्या प्रवाशांना फ्री सीट सिलेक्शन (Free seat selection) तसेच फ्री मील ( मोफत भोजन) (Free Meal) सुविधेचा लाभ घेता येणार आहे. गो फर्स्ट कंपनीच्या विमानाने जाणारे प्रवासी, त्यांची आवडती सीट निवडू शकतात, त्यासाठी त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच प्रवासादरम्यान मोफत भोजनही देण्यात येईल. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्याद्वारे विविध ऑफर्स जाहीर केल्या जात असून गो फर्स्टने या आधी मान्सून स्पेशल ऑफरही आणली होती.

हे सुद्धा वाचा

काय आहे फ्रीडम ऑफर ?

गो फर्स्ट या मुंबईस्थित विमान कंपनीने ट्विटरवरून फ्रीडम ऑफरसदंर्भात माहिती दिली आहे. या ऑफर अंतर्गत 30 ऑगस्ट 2022 पर्यंत तिकीटे बूक करता येणार आहेत. बूक केलेल्या तिकिटाद्वारे 25 जुलै ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रवास करता येईल. जे प्रवासी मुंबई, पुणे व अहमदाबाद येथून प्रवास करणार आहेत, त्यांना या ऑफरचा लाभ घेता येईल. या ऑफरनुसार, दिलेल्या कालावधीत तिकीटे बूक केल्यास प्रवाशांना त्यांच्या आवडीची सीट निवडता येऊ शकते. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे भरावे लागणार नाहीत. तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत भोजनही देण्यात येणार आहे.

 

गो फर्स्ट एअरलाइन ही ‘लो कॉस्ट कॅरिअर’ मानली जाते, कारण या एअरलाइद्वारे प्रवासी कमी दरांत तिकीटे बूक पकरून प्रवास करू शकतात. गेल्या महिन्यात कंपनीने मान्सून स्पेशल ऑफर जाहीर केली होती. त्यानुसार देशांतर्गत प्रवासासाठी तिकीटाची किंमत 1499 रुपयांपासून सुरू झाली होती. ही ऑफर 7 जुलै ते 10 पर्यंत सुरू होती. व त्या काळात बूक करण्यात आलेल्या तिकीटावर 26 जुलै 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत प्रवास करता येणार आहे. ‘फर्स्ट कम फर्स्ट गेट’ म्हणजेच प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य, या तत्वावर या ऑफरचा लाभ लोकांना घेता येणार होता.

यापूर्वीही दिली होती फ्री सीट सिलेक्शनची सुविधा

दरम्यान कंपनीची फ्री सीट सिलेक्शन आणि फ्री मील ( मोफत भोजन) ही सुविधा जुलै महिन्यातही सुरू होती. मात्र त्या सुविधेचा लाभ केवळ मंगळवार व बुधवारपुरता मर्यादित ठेवण्यात आला होता. म्हणजेच प्रवाशांनी मंगळवार व बुधवारी प्रवास केला तर त्यांना ही सुविधा मिळते. तसेच अनलिमिटेड री-शेड्यूलिंगचा फायदाही प्रवाशांना मिळेल. कंपनीतर्फे कपल्ससाठी 1000 रुपयांचे फ्री फूड हॅम्पर आणि कुटुंबासाठी 2000 रुपयांचे फ्री फूड हॅम्पर मिळते. 25 सप्टेंबर 2022 पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. हा बुकिंग कालावधी असून प्रवासाचा कालावधी 7 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.