राजस्थानला भेट द्यायला सगळ्यांनाच आवडते. राजस्थानची राजधानी जयपूर नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती असते. गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर तेथील इतिहासासाठी देखील प्रसिद्ध आहे. जयपूरमधील जयगड किल्ला हा जगप्रसिद्ध आहे. हा किल्ला पहाण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात.
तुम्ही जर जयपूरला गेलात तर या किल्ल्याला आवश्य एकदा भेट द्या. हा किल्ला 18 व्या शतकात बांधण्यात आला. जगातील सर्वात मोठी तोफ त्यावेळी किल्ल्यावर होती. युद्धाच्या काळात या तोफेचा उपयोग केला जात असे.
असा दावा केला जातो की, या किल्ल्यात सवाई जयसिंग द्वितीय यांचे वास्तव्य होते. या किल्ल्यामध्ये एक खजिना होता. याच खजिन्याचा उपयोग करून, सवाई जयसिंग द्वितीय यांनी जयपूर शहराचा विकास केला. परंतु मुघलांच्या राजवटीत हा किल्ला प्रामुख्याने तोफखान्यासाठीच ओळखला जात असे.
असाही दावा केला जातो की, आजही या किल्ल्यात मोठ्याप्रमाणात सोने, चांदी दडवून ठेवण्यात आली आहे. मात्र हा खजिना अद्याप कोणालाही मिळालेला नाही. किल्ला लाल दगड आणि वाळूच्या मिश्रणातून बांधला असून, किल्ल्यामध्ये विविध महाल आहेत.
इतकंच नाही तर जयगड किल्ल्यातील कोर्ट रूम आणि हॉलच्या भव्य खिडक्या किल्ल्याचे सैंदर्य आणखी वाढवतात. या किल्ल्याचा इतिहास जेवढा रोचक आहे. तेवढाच या किल्ल्याच्या भोवतालचा परिसर हा निर्सगसंपन्न आहे. ज्यांना छायाचित्र घेण्याची आवड आहे, अशांसाठी तर हा किल्ला एक परफेक्ट असा स्पॉट आहे. अशा लोकांनी एकदा तरी या किल्ल्यााला भेट द्यावी.
तुम्ही जर राजस्थानला फीरण्यासाठी अथवा हा किल्ला पहाण्यासाठी जात असाल तर शक्यतो हिवाळ्यात जाण्याचा सल्ला दिला जातो. कारण उन्ह्याळ्यामध्ये इथे कडक उन असते. अशा उन्हामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक मर्यादा येतात.