Train Ticket : बुकिंग नंतरही ट्रेनच्या तिकीटाची तारीख बदलता येते का? रेल्वेचा नियम काय आहे?

| Updated on: Dec 05, 2024 | 3:58 PM

Train Ticket : तिकीटाची तारीख बदलली जाता येते की नाही? हाच सर्वात मोठा सवाल आहे. बुक करण्यात आलेल्या कन्फर्म तिकीटाची तारीख बदलली जाते? हा सर्वांना प्रश्न भेडसावतो. तिकीटावरची तारीख बदलली जाणार नसल्याने पैसे पाण्यात जाण्याची भीतीही त्यांना वाटते. त्यामुळे एकदा बुक केलेल्या तिकिटाची तारीख बदलता येते का?

Train Ticket :  बुकिंग नंतरही ट्रेनच्या तिकीटाची तारीख बदलता येते का? रेल्वेचा नियम काय आहे?
express train
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भारतात लाखो करोडो लोक रोज प्रवास करत असतात. त्यामुळे रेल्वेनेही काही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. रेल्वेने आता 60 दिवस आधी तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे. अशावेळी अनेकदा लोक घाईत टिकट बुकिंग करण्याची चुकीची तारीख टाकतात. पैसेही भरतात. मात्र, नंतर आपण चुकीच्या तारखेचं तिकीट बुक केल्याचं त्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे तिकीट वाया जाणार असल्याची भीती निर्माण होते. तिकीटावरची तारीख बदलली जाणार नसल्याने पैसे पाण्यात जाण्याची भीतीही त्यांना वाटते. त्यामुळे एकदा बुक केलेल्या तिकिटाची तारीख बदलता येते का? याबाबतचे रेल्वेचे काय आहेत नियम? यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.

तिकीटाची तारीख बदलली जाता येते की नाही? हाच सर्वात मोठा सवाल आहे. बुक करण्यात आलेल्या कन्फर्म तिकीटाची तारीख बदलली जाते? हा सर्वांना प्रश्न भेडसावतो. त्याचं उत्तर होय असं आहे. तिकीटाची तारीख बदलण्याची सुविधा रेल्वेने दिली आहे. काही अटी आणि शर्तीवर ही तारीख बदलता येते. त्यालाच तिकीट पोस्टपोन वा प्रीपोन म्हटलं जातं.

तर तारीख बदलत नाही

भारतीय रेल्वेने ही प्रक्रिया केवळ काऊंटर बुक करण्यात आलेल्या कन्फर्म आणि आरएसी तिकीटासाठीच लागू केली आहे. ऑनलाइन बुक करण्यात आलेल्या ई-तिकीटसाठी तारीख बदलण्याचा पर्याय नाहीये. जर तुम्ही तिकीट आयआरसीटीसीच्या वेबसाईवर बुक केला असेल तर तारीखात बदल केला जात नाही.

खास गोष्ट काय?

तुम्ही कन्फर्म वा आरएसी तिकीटाची तारीख ऑनलाइन किंवा ऑफलाइन बदलू शकता. ऑफलाइनसाठी काही नियम आहेत. ट्रेनच्या प्रस्थानाच्या कमीत कमी 48 तासा आधी तुम्हाला तुमचं तिकीट आरक्षण रिझर्व्हेशनवर जमाव करावं लागेल. त्यात नवीन तारखेचा उल्लेख करावा लागेल. तुम्ही कोचची कॅटेगिरीही बदलू शकता.

ऑनलाइनसाठी नियम काय?

तुम्हाला तुमचं सध्याचं तिकीट रद्द करावं लागेल. ज्या तारखेला तुम्हाला प्रवास करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला नवीन तिकीट घ्यावं लागेल. कन्फर्म तिकीट रद्द करण्यासाठी तुम्हाला त्या कॅटेगिरीचा चार्ज द्यावा लागेल.

तिकीटाची तारीख कशी बदलणार

ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तुम्हाला जवळच्या रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटरवर जाऊन तिकीटाची तारीख बदलावी लागेल

तुमचं ओरिजिनल तिकीट जमा करावं लागेल. प्रवासाची तारीख सांगून दुसरं तिकीट घेऊ शकता. (म्हणजे त्या दिवसाचं तिकीट मिळत असेल तर)

या प्रोसेससाठी तुम्हाला काऊंटरवर संबंधित फॉर्म भरावा लागेल. तसेच तिकीटाची फोटोकॉपी जमा करावी लागेल

तिकिटाची तारीख बदली करण्यासाठी प्रति प्रवासी 20 ते 65 रुपये शुल्क आकारले जाते.

Change Date in Booked Train Tickets : भारतीय रेल्वेने तिकीटाची तारीख बदलण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हाला गाडी सुटण्याच्या 48 तास आधी तिकीटाची तारीख बदलता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला रेल्वेच्या काऊंटरवर जावं लागेल.