Karnataka Travel : कर्नाटकमधील ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!

| Updated on: Nov 01, 2021 | 10:43 AM

कर्नाटकमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. कर्नाटक हे भारतातील टॉप 4 पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. दरवर्षी अनेक पर्यटक येथे सुंदर नजारे पाहण्यासाठी जातात. कर्नाटकात 5 राष्ट्रीय उद्याने आणि 25 हून अधिक वन्यजीव अभयारण्ये आहेत. ज्यापैकी बांदीपुर आणि नागरहोल राष्ट्रीय उद्याने सर्वात प्रसिद्ध आहेत.

Karnataka Travel : कर्नाटकमधील या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!
कर्नाटक
Follow us on

मुंबई : कर्नाटकमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. कर्नाटक हे भारतातील टॉप 4 पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. दरवर्षी अनेक पर्यटक येथे सुंदर नजारे पाहण्यासाठी जातात. कर्नाटकात 5 राष्ट्रीय उद्याने आणि 25 हून अधिक वन्यजीव अभयारण्ये आहेत. ज्यापैकी बांदीपुर आणि नागरहोल राष्ट्रीय उद्याने सर्वात प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला कर्नाटकातील काही खास प्रसिद्ध शहरांबद्दल सांगणार आहोत.

कुर्ग

कुर्ग हे पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. हे पर्यटन स्थळ निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग म्हणून ओळखले जाते. हे एक हिल स्टेशन आहे. जिथे हिरव्यागार टेकड्यांसोबतच नद्यांचे सुंदर दृश्य दिसते. कुर्गला हे कोडागु म्हणून देखील ओळखले जाते.

गोकर्ण

गोकर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे खूप ओळखले जाते. येथील समुद्रकिनारे खूप खास आणि वेगळे आहेत. गोकर्णचे एक आकर्षक मंदिर देखील आहे. जर तुम्हाला सुट्टी कुठेतरी शांततेत घालवायची असेल तर हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

हम्पी

हम्पी हे शहर त्याच्या खंडहरोंसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जाही मिळाला आहे. इथल्या डोंगर-दऱ्या पर्यटकांना खूप आवडतात. इतिहासाची झलकही येथे पाहिला मिळते.

नंदी हिल्स

बॅंगलोरपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेले हे कर्नाटकातील प्रसिद्ध ठिकाणही आहे. नंदी हिल्स पर्यटकांची खास पसंती बनले आहे. येथील सूर्योदयाचे आकर्षक दृश्य पाहण्यासाठी तुम्ही वीकेंडमध्ये येथे नक्की जाऊ शकता.

म्हैसूर

म्हैसूर हे कर्नाटकातील असेच एक पर्यटन स्थळ आहे जे “द सिटी ऑफ पॅलेस” साठी प्रसिद्ध आहे. हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील तिसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथे दरवर्षी शेकडो लोक भेट देतात.

संबंधित बातम्या : 

Tourist Places : उत्तर भारतातील ‘ही’ पर्यटन स्थळे हिवाळ्यात भेट देण्यास उत्तम!

यूपीमध्ये फिरण्यासाठी ‘ही’ आहेत सुंदर ठिकाणे, एकदा नक्की भेट द्या

(Karnataka Travel Visit these tourist places in Karnataka)