मुंबई : भारतात (India) अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यांची ओळख देशातच नाही तर परदेशातही आहे. यापैकी एक ताजमहाल आहे. जो आपल्या सौंदर्य आणि उत्कृष्ट वास्तुकलेसाठी जगातील एक आश्चर्य म्हणून ओळखला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की या अनोख्या वारसाआधीही आग्राच्या (Agra) ताजमहालच्या अगोदर भारतात दुसरा ताजमहाल होता. वृत्तानुसार, सम्राट शाहजहाँच्या आधी एका मुघल शासकाने भारतात ताजमहालसारखी ऐतिहासिक वास्तू बांधली होती. मात्र, कालांतराने ही इमारत (Building) जुनी झाली आणि तिचा रंग काळा पडण्यास सुरूवात झाली. भारतात सध्या हा ताजमहाल कुठे आहे आणि त्याच्याशी संबंधित रंजक गोष्टी आपण माहिती करून घेणार आहोत.
काळा ताजमहाल म्हणून ओळखली जाणारी ही इमारत भारताच्या मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे आहे. इतिहासकारांच्या मते, सम्राट शाहजहानने पत्नी मुमताजच्या प्रेमापोटी उभारलेला संगमरवरी मुकुट, बुरहानपूरची ही वास्तू लक्षात घेऊन तयार करण्यात आली होती. मात्र, पावसात माती आणि धूळ यामुळे हा काळा पडला.
रिपोर्ट्सनुसार ही एक कबर आहे, जी शाहनवाज खानसाठी बांधली गेली होती. हे बुरहानपूरच्या नवाब अब्दुल रहीम खानाचा मुलगा शाहनवाज खान यांच्यासाठी बांधले गेले. तज्ञांच्या मते, त्याचे बांधकाम 1622 मध्ये सुरू झाले. जर तुम्ही मध्य प्रदेशला जाणार असाल तर ही वास्तू नक्कीच बघायला जा.
बऱ्याच वर्षांपासून स्वच्छतेअभावी ही इमारत काळवंडली होती. पुरातत्व विभागाने साफसफाईची जबाबदारी घेत केमिकल टाकून साफसफाई सुरू केली. या साफसफाईनंतर आता ही इमारत काळ्यापासून तपकिरी दिसू लागली आहे. त्याच्या रंगात सुधारणा झाल्यानंतर ते पाहण्यासाठी पर्यटकही येऊ लागले आहेत.