कॅब ड्रायव्हर उर्मटपणे बोलतोय! ‘या’ भाषेत शिकवा धडा

| Updated on: Dec 01, 2024 | 2:12 PM

जर तुम्ही कॅबने प्रवास करत असाल तर तुम्हाला या सेफ्टी ट्रिक्स माहित असणं गरजेचं आहे. याद्वारे तुम्हाला कॅबमध्ये असुरक्षित वाटेल तेव्हा तुम्ही स्वत:चे संरक्षण करू शकाल.

कॅब ड्रायव्हर उर्मटपणे बोलतोय! या भाषेत शिकवा धडा
Follow us on

आजच्या घडीला मुलगा असो वा मुलगी सुरक्षेच्या दृष्टीने कोणीच टेन्शन फ्री नसतं. प्रत्येकाच्या मनात सुरक्षिततेबाबत चिंता असतेच. अशावेळी कॅबने तुम्ही किंवा तुमच्या मुलांना जर एकट्याने प्रवास करायचा असेल तर सुरक्षितेच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाला प्रवासादरम्यान चांगलाच अनुभव येईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अशी परिस्थिती कशी टाळता येईल, हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे.

कॅबने एकटे प्रवास करताना फोनमध्ये इमर्जन्सी सेटिंग्ज आणि सेफ्टी कम्फर्ट असणे महत्वाचे आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही गरजेच्या वेळी फॉलो करू शकता.

ऑडिओ रेकॉर्डिंग फीचर

जर तुम्ही अनेकदा उबर कॅबने प्रवास करत असाल तर येथे आम्ही तुम्हाला एका अशा फीचरबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही जवळजवळ वापर केलेला नाही. ही सुविधा फक्त उबर कॅबच्या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहे, कंपनीने प्रवासी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उबरचे ऑडिओ रेकॉर्डिंग फीचर दिले आहे. या फीचरच्या माध्यमातून केवळ प्रवाशाचीच नव्हे तर ड्रायव्हरच्या सुरक्षितताही जपली जाते. प्रत्यक्षात अनेकवेळा ड्रायव्हर बरोबर असतो पण प्रवाश्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही.

या फीचरच्या मदतीने प्रवासी आणि कॅब ड्राइव्हर या दोघांच्या सुरक्षेची बाब पक्की केली जाते. तुम्हाला जर प्रवासादरम्यान सुरक्षित वाटत नसल्यास, तुम्ही या ॲप्लिकेशनच्या ऑडिओ रेकॉर्डद्वारे तुमच्या संपूर्ण प्रवास रेकॉर्ड करू शकता.

अशा प्रकारे काम करते ऑडिओ रेकॉर्डिंग फीचर

ओला किंवा उबरने जेव्हा तुमचा प्रवास सुरु होतो तेव्हा तुम्हाला आप्लिकेशनद्वारे ऑडिओ रेकॉर्डिंग फीचर दिसू लागते, प्रवासात तुम्हाला जेव्हा सुरक्षित वाटत नाही त्या वेळेला तुम्हाला तुमच्या प्रवासाचा ऑडिओ रेकॉर्ड करणं गरजेचं वाटत असेल तर तुम्ही या पर्यायावर क्लिक करू शकता. मॅपमध्ये उजव्या कोपऱ्यावर हा पर्याय दिसेल, त्यासाठी तुम्हाला ब्लू आयकॉनवर क्लिक करावं लागेल.

ब्लू आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑडिओ रेकॉर्डिंग चालू करा. आता तुमच्या संपूर्ण प्रवासाचा ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू होईल. तुमच्यात आणि ड्रायव्हरमध्ये जे काही घडत आहे, जे काही आवाज येत आहेत, ते सगळं रेकॉर्ड केलं जाईल.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

याशिवाय इतर कोणतेही ॲप्लिकेशन वापरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. कॅबमध्ये चढण्यापूर्वी ड्रायव्हरच्या प्रोफाईलची जुळवाजुळव करा.

प्रवास सुरू होताच आपल्या राइडचे लाईव्ह लोकेशन जवळच्या व्यक्तीला शेअर करा. यामुळे तुमच्या प्रत्येक क्षणाची माहिती समोरच्या व्यक्तीला मिळत असते.

चाइल्ड लॉककडे लक्ष द्या, कॅबमध्ये चाइल्ड लॉकला परवानगी नाही, जर तुमच्या ड्रायव्हरने चाइल्ड लॉक बसवले असेल तर तुम्ही त्याच्याशी बोलू शकता.

तक्रार कशी करायची?

जवळजवळ सर्व ॲप्लिकेशनमध्ये, आपल्याला रिपोर्ट आणि मदतीचा पर्याय मिळतो. या फिचर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. जर हे काम करत नसेल तर तुम्ही कंपनीला मेलही करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही ईमेल आयडी मिळवू शकता.