IRCTC कडून तिकीट बुक करण्यात अडचणी? ‘या’ सोप्या पद्धतीने करा बुकिंग

| Updated on: Jan 10, 2025 | 6:10 PM

अलीकडेच आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि ॲपमध्ये काही अडचणी आल्या होत्या. ज्यामुळे अनेक लोकांना रेल्वे तिकीट बुक करण्यात अडथळे आले. अशावेळी जाणून घ्या आयआरसीटीसी व्यतिरिक्त कोणत्या पर्यायांमधून तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकिटे बुक करू शकता.

IRCTC कडून तिकीट बुक करण्यात अडचणी? या सोप्या पद्धतीने करा बुकिंग
current ticket
Follow us on

देशात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. तर अनेकजण गावी जाणयासाठी तसेच बाहेर फिरायला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्याला पहिले प्राधान्य देतात . कारण प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर असल्याने बहुतेक लोकं राखीव डब्यातून प्रवास करणे पसंत करतात. मात्र यासाठी रेल्वेतिकीट बुकिंग अगोदरच करावे लागते, जेणेकरून तुम्हाला कन्फर्म सीट मिळू शकेल. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे रेल्वे तिकिटे बुक करू शकता, ज्यामध्ये ऑफलाइन तिकीट बुकिंग थोडे अवघड आहे कारण तुम्हाला रेल्वे काउंटरवर जावे लागते आणि तासंतास लांब रांगेत उभे राहावे लागते.

त्याचबरोबर रेल्वे स्टेशनला जाऊन रांगेत उभे रहाण्याऐवजी तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे ऑनलाइन तिकीट बुकिंग करू शकतात. अशाने तुमचा वेळ देखील वाचतो. आजकाल असे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जिथून तुम्ही आरामात तुमचे ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. या ॲप्स आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ट्रेन तिकीट बुकिंग अधिक सोपे करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या ॲप्स आणि वेबसाईट्सबद्दल…

ऑनलाइन रेल्वे तिकिटे कुठे बुक करावीत?

IRCTC

हे सुद्धा वाचा

तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट (www.irctc.co.in) आणि रेल कनेक्ट ॲपवर जाऊन तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता, परंतु यासाठी तुम्हाला आधी आयआरसीटीसी ॲप डाउनलोड करून अकाउंट तयार करावे लागेल. मात्र अलीकडेच आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि ॲपमध्ये काही अडचणी आल्या होत्या. अशावेळी जाणून घ्या आयआरसीटीसी व्यतिरिक्त कोणत्या पर्यायांमधून तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकिटे बुक करू शकता.

 

MakeMyTrip

मेक माय ट्रिप हे एक लोकप्रिय ट्रॅव्हल बुकिंग ॲप आहे जिथून तुम्ही सहजपणे रेल्वे तिकिटे बुक करू शकता. तसेच यात तुम्हाला अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की Trip Guarantee फीचर. दरम्यान यात तुम्हाला कन्फर्म तिकीट न मिळाल्यास कंपनी तुम्हाला पैशांसोबत कूपन देते.

Ixigo

इक्सिगो ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही रेल्वेची तिकिटे बुक करू शकता. या ॲपमध्ये तुम्हाला सर्व गाड्यांची माहिती, तिकीट कन्फर्मेशन अंदाज आणि ट्रेन ट्रॅकिंगची माहिती मिळते.

Paytm

पेटीएम सामान्यत: लॉग पेमेंट ॲप म्हणून ओळखले जाते, परंतु तुम्ही त्याद्वारे रेल्वे तिकिटे देखील बुक करू शकता. तुम्हाला पेटीएमवर अनेक ऑफर्स मिळतात आणि तुम्ही इथे कन्फर्मेशन प्रॉबेबिलिटी देखील पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता दिसून येते.

ConfirmTkt

जर तुम्हाला तातडीचे तिकीट हवे असेल आणि आयआरसीटीसीकडे बुकिंग करता येत नसेल तर ConfirmTkt ॲप हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही कन्फर्म तिकिटे सहज बुक करू शकता आणि वेटिंग लिस्टच्या तिकिटांची शक्यताही तपासू शकता. तसेच हे ॲप इन्स्टंट तिकीट बुक करण्यासही मदत करते.