सुट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत आहात? तर महाबलीपुरमची निवड करू शकता; ‘ही’ स्थळे तुमची ट्रीप बनवतील खास
जर उन्ह्याळ्याच्या सुट्यांमध्ये तुमचा कुठे फिरायला जायचा प्लॅन असेल, तर त्यासाठी तुम्ही तामिळनाडू स्थित महाबलीपुरमची निवड करू शकता. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व आहे. सोबतच महाबलीपुरममध्ये असे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत जे तुमची ट्रीप खास बनवू शकतात. आज आपण महाबलीपुरममधील अशाच काही स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.
1 / 5
महाबलीपुरम हे तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये असलेले एक ठिकण आहे. महाबलीपुरम हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तुम्ही जर महाबलीपुरमला गेलात तर इथे फिरण्यासाठी तुम्हाला मंदिरापासून तर सुंदर बीचपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध होतात. ही सर्व प्रेक्षणीय स्थळे तुमची ट्रीप स्पेशल बनवतील यात काही शंकाच नाही. आज आपण महाबलीपुरममधील अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
2 / 5
शिरुक्लुकुंदराम मंदिर : शिरुक्लुकुंदराम मंदिर हे महाबलीपुरममधील एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. हे मंदिर टेकडीवर वसलेले आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी दरवर्षी देशभरातून हाजारो पर्यटक येतात. शिरूक्लुकुंदराम मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदिराच्या भिंतीवर डच, इंग्रजी आणि प्राचीन भारतीय भाषांमध्ये शिलालेख कोरलेले आढळून येतात.
3 / 5
कृष्णेचा बटरबॉल : कृष्णेचा बटरबॉल हे महाबलिपुरममधील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण आहे. जे पर्यटक महाबलीपुरमला येतात. ते सर्व पर्यटक आवर्जून या जागेला भेट देतात. कृष्णेचा बटरबॉल हे ठिकाण महाबलिपुरमच्या समुद्र किणाऱ्यावर असलेल्या एका टेकडीवर स्थित महाकाय दगडाची शिला आहे. या दगडाचे वैशिष्य म्हणजे हा दगड खाली घरंगळत येत असल्याचा भास होतो. मात्र हा दगड आपल्या जागेवर स्थिर आहे.
4 / 5
गंगा उद्गम : गंगा उद्गम हे देखील महाबलिपुरममधील एक प्रसिद्ध असे स्थळ आहे. गंगा उद्गम हे वेस्ट स्ट्रीटवर असलेले एक विशाल असे दगडी स्मारक आहे. या दगडावर भारतामध्ये सर्वात पवित्र मानण्यात येणारी गंगा नदीच्या उगमाची अख्यायिका चित्र स्वरूपात कोरली आहे.
5 / 5
महाबलीपुरम बीच : महाबलीपुरम बीच हा चेन्नई शहरापासून 58 किमी दूर आहे. जे लोक महाबलीपुरम पाहण्यासाठी येतात. ते या बीचला आवश्य भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.