मुंबई : मध्यप्रदेश आपल्या संस्कृती आणि वारशासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे, स्मारके, धार्मिक स्थळे आणि संग्रहालये आहेत. हे शहर पर्यटकांना खूप आकर्षित करते. सांची स्तूप भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध स्मारकांपैकी एक आहे. ही दगडी रचना युनेस्कोची जागतिक वारसा देखील आहे. मध्यप्रदेशातील सांची स्तूपला भेट देणाऱ्यासाठी काही महत्वाच्या टिप्स. (Visit sanchi stupa the historical site of madhya pradesh)
सांची स्तूप
हे भोपाळपासून 46 किमी अंतरावर आहे. ज्यावेळी तुम्ही भोपाळला जाणार आहात, तेव्हा तुम्ही अवश्य भेट द्या. सांची स्तूप मध्यप्रदेशातील रायसेन येथे आहे. जे सम्राट अशोकांनी बांधले आहे. जे मौर्य घराण्याचे तिसरे सम्राट होते. हे मौर्य युगात इ.स.चे तिसरे शतक ते इसवी सनच्या बाराव्या शतकात बांधले गेले आहे आणि ते स्तूप आणि बौद्ध संरचनांसाठी ओळखले जाते. जनरल टेलर या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1818 मध्ये सांची स्तूप शोधले होते. बौद्ध धर्मीयांसाठी हे ठिकाण खूप महत्वाचे आहे, वर्षभर मोठ्या संख्येने लोक येथे येतात.
स्थान
स्तूप हे रायसेन जिल्ह्यात आहे आणि भोपाळपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे. स्तूप परिसरामध्ये आपल्याला गाइड मिळतील. संपूर्ण स्तूपची माहिती घेण्यासाठी सुमारे एक तास लागेल. सांची स्तूप संकुलाच्या अगदी मध्यभागी आहे. घुमटाच्या आकाराचे हे स्मारक 120 फूट रुंद आणि 54 फूट उंच आहे.
तिकीट
स्तूपमध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागते. तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाईन बुक करू शकता किंवा कॅम्पसच्या बाहेर तिकीट काउंटरवर खरेदी करू शकता. हे तिकीट भारतीयांसाठी प्रति व्यक्ती 40 रुपये आणि परदेशी प्रवाशांसाठी प्रति व्यक्ती 600 रुपये आहे. 15 वर्षाखालील मुलांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
जाण्याचा मार्ग
येथे पोहोचणे खूप सोपे आहे. या क्षेत्रासाठी सर्वात जवळचे विमानतळ भोपाळमध्ये आहे. विमानतळाच्या बाहेर अनेक प्रीपेड टॅक्सी उपलब्ध आहेत. ज्या एका फेरीसाठी सुमारे 2000 रुपये आकारण्यात येतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी भोपाळ आणि विदिशा रेल्वे स्टेशन जवळ आहेत. विसदिशापासून सांची फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.
संबंधित बातम्या :
अंदमान आणि निकोबार बेटांवर जाण्याचे नियोजन करताय? जाणून घ्या सर्व माहिती फक्त एका क्लिकवर
Hill Stations : कमी बजेटमध्ये भेट देण्यासाठी जयपूरजवळील हिल स्टेशन सर्वोत्तम पर्याय
आयआरसीटीसीकडून चारधाम यात्रेसाठी विशेष टूर पॅकेज, डीलक्स एसी टुरिस्ट ट्रेन सुरु
(Visit sanchi stupa the historical site of madhya pradesh)