सर्दी आणि खोकल्याने त्रस्त आहात तर एकदा नक्की ट्राय करा बेसनचा शिरा

| Updated on: Nov 17, 2023 | 7:39 PM

Cold and cough : तुम्हाला देखील जर सर्दी आणि खोकला याचा त्रास होत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करु शकतात. कोणत्याही आरोग्याच्या समस्येसाठी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा नेहमी सल्ला घ्यावा.

सर्दी आणि खोकल्याने त्रस्त आहात तर एकदा नक्की ट्राय करा बेसनचा शिरा
besan sheera
Follow us on

Besan Sheera : हिवाळी ऋतू सुरु झाला की अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्दी आणि खोकला आता सामान्य झाले आहे. प्रत्येकाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. अनेक औषधे घेऊन देखील ती बरी होण्याचं नाव घेत नाही. अशा वेळेस सोबत तुम्ही काही घरगुती उपाय देखील केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. ते म्हणजे बेसनाचा शिरा. चला याची रेसिपी जाणून घेऊया.

बेसनाच्या गुळामुळे सर्दी होते नाहीशी

हिवाळा म्हटले की,  धुके, थंडी आणि प्रदुषण यामुळे लोकांना सर्दी आणि खोकला होतो. तसेच कोरड्या त्वचेची समस्या देखील होते. निरोगी व्यक्ती देखील याला बळी पडते.

सर्दी असली की वाफ घेतली पाहिजे. डॉक्टरांकडे गेले तर ते कफ सिरप आणि इतर औषधे देतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केलाच पाहिजे. पण सोबत तुम्ही काही घरगुती उपाय देखील केले पाहिजे. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला बेसन शिरा कसा बनवायचा याबद्दल सांगणार आहोत.

बेसन शिरा बनवण्याची रेसिपी

साहित्य

एक चमचा तूप
दोन चमचे बेसन
एक ते दोन खजूर
एक चिमूटभर काळी मिरी पावडर
वेलची पावडर
एक चिमूटभर हळद
एक कप दूध

चवीनुसार गुळ

कृती

सर्वात आधी तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाला की, त्यात एक चमचा तूप घाला.
तूप गरम झाल्यावर त्यात दोन चमचे बेसन घालून चांगले भाजून घ्या.
आता चिमूटभर हळद, काळी मिरी पावडर, वेलची पावडर घाला.
थोडा वेळ परतून झाल्यावर त्यात चिरलेला खजूर घाला.
मिश्रण सतत ढवळत राहा. त्यानंतर त्यात दूध घालावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
ते जास्त पातळ करू नका जेणेकरून चमच्याने खाता येईल.
जर तुम्हाला ते ग्लासमध्ये ओतून प्यायचे असेल तर तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू शकता. जेणेकरून ते थोडेसे द्रव्य स्वरुपात राहील.