नवी दिल्ली- सध्या सणासुदीचे वातावरण आहे. दिवाळीच्या (Diwali) दिवसांत मिठाईसोबतच फटाक्यांचीही रेलचेल असते. सणांच्या दिवसांत सर्वांनाच सुंदर दिसायची इच्छा असते. मात्र धूळ, प्रदूषण आणि माती यामुळे त्वचेवर टॅन (tanning) जमा होते ( त्वचा काळवंडते). अशा परिस्थितीमध्ये आपली त्वचा निर्जीव दिसू लागते. डेड स्किन सेल्स (dead skin) हटवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी बनवलेल्या स्क्रबचा वापर करू शकता. स्क्रब केल्याने मृत त्वचा , घाण आणि धूळ निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते. जाणून घेऊया गरी स्क्रब कसा तयार करावा.
साखर व कोरफडीचे स्क्रब –
कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ती त्वचेसाठी व केसांसाठी फायदेशीर असते. त्वचेसाठी हे स्क्रब तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये 1 चमचा साखर घ्यावी. त्यामध्ये एक चमचा कोरफडीचे घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून त्वचेवर लावावे आणि काही वेळ स्क्रब करावे. ते चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे राहू द्यावे. वाळल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
ओट्स व दह्याचा स्क्रब –
एका बाऊलमध्ये 2 चमचे ओट्स घ्यावेत, त्यामध्ये एक चमचा दही घालावे चेहऱ्याला लावावे आणि त्वचेला काही वेळ मसाज करावा. हा स्क्रब काही मिनिटांसाठी तसाच ठेवा. यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुवावी.
लाल मसूर आणि दह्याचा स्क्रब –
एका बाऊलमध्ये लाल मसूर डाळीची 2 चमचे पूड घ्यावी. त्यामध्ये दही मिसळावे. नीट एकत्र करून चेहऱ्याला लावा आणि स्क्रब करा. ते 10 मिनिटे ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. काही दिवसांत फरक दिसून येईल.
कॉफी आणि कच्च्या दुधाचा स्क्रब –
एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्यावी. त्यामध्ये 1 ते 2 चमचे कच्चे दूध घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून चेहरा आणि मानेला लावावे आणि मालिश करावे. हा स्क्रब 5 ते 10 मिनिटे तसाच राहू द्यावा. त्यानंतर चेहरा व मान साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा.