मुंबई : दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. दही खाणे आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर चांगले नाहीतर दही हे आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. दह्याचा हेअर पॅक जर आपण केसांना लावला तर आपले केस चमकदार आणि सुंदर होतील. (Use curd hair packs for shiny hair)
दहीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत जे डोक्यातील कोंडा आणि स्काल्पशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने आपल्या स्काल्पची मालिश करा आणि कोरडे होऊ द्या. व्यवस्थित कोरडे झाल्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा.
दोन चमचे दही, एक चमचा कोरफड जेल, ऑलिव्ह ऑइल एक चमचा एका वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. आपल्या केसांच्या लांबीनुसार सामग्रीचे प्रमाण ठरवू शकता. टाळूसह संपूर्ण केसांवर हे पॅक लावा. 20 मिनिटे आपल्या टाळूचा हलक्या हाताने मसाज करावा. हेअर पॅक केसांमध्ये 40 मिनिटांसाठी राहू द्यावे. यानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या आणि कंडिशनर देखील लावा.
दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Use curd hair packs for shiny hair)