प्रत्येक जण आपलं घर फार विचारपूर्वक बनवतात. यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. अनेक लोक तर आपलं आयुष्याची सगळी जमापुंजी आणि गुंतवणूक घरासाठी खर्च करतात. पण तरीही घरात शांती आणि प्रसन्नता मिळत नाही असं अनेकदा होताना पाहिलं असेल. सगळं काही आहे पण आनंद नाही. यावेळी अनेक लोक नशिबाला दोष देतात पण यामध्ये कधी घराचाही दोष असू शकतो. (vaastu tips for how to make your bedroom in this direction for childbirth)
खरंतर, तुम्ही घरात मुल होत नाही असं ऐकलं असेल. पण यामध्ये तुमच्या वास्तुचाही दोष असू शकतो. उत्तर दिशेला उर्ध्वमुखी म्हणजेच वरची दिशा मानली जातं. हे वाढ आणि विस्ताराचं प्रतीक आहे. त्याचे स्वामी बुध ग्रह आहे. हा ग्रह पश्चिम दिशा आणि उत्तर दिशेचं मिलन आहे. यामध्येही एक अतिथी कक्ष असतो. म्हणजे पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे शुभ मानलं जातं. ज्या घरामध्ये पश्चिमी दिशेचा भाग उत्साही आणि सकारात्मक असेल तिथे पाहुण्यांचे स्वागतही मनापासून केले जाते.
या संसाराचा नियम लक्षात घेतला तर मुलंही एक पाहुणा म्हणूनच आपल्या घरात आणि आयुष्यात येतो. यामुळे उत्तर आणि पश्चिम दिशेच्या दरम्यान जोडप्याचं मिलन चांगलं मानलं जातं. इथल्या उत्तर दिशेला नेहमी खिडक्या असव्यात. त्याला छान पडदेही तुम्ही लावू शकता. बेडरूममध्ये हलके रंग वापरा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बेडची दिशा पूर्व-पश्चिम असली पाहिजे. झोपताना, डोकं पूर्वेकडे असावं. पायाच्या दिशेने एक तरी खिडकी किंवा दरवाजा असला पाहिजे. यामुळे बेडरूममध्ये जोडप्याचा गोडवा वाढतो. आनंद आणि संस्कारांमध्येही वाढ होते. (vaastu tips for how to make your bedroom in this direction for childbirth)
संबंधित बातम्या –
(vaastu tips for how to make your bedroom in this direction for childbirth)