नवी दिल्ली : ती ईराणमधील, तो भारतीय. एका हास्याने दोघांना जवळ आणले. परंतु या प्रेमकथेत भारतीय लाजाळू मुलाने नव्हे ईराणी मुलीने प्रोपज केले. दोन वेगळ्या संस्कृतीनंतरही हे दोन्ही जण विवाह बंधनात अडकले. मुलीने स्वत: एका व्हिडिओमध्ये तिची प्रेमकथा शेअर करताना संपूर्ण कहाणी सांगितली आहे. ती इराणी मुलगी लहानपणापासूनच बॉलिवूडवर प्रेम करत होती. तिला अमिताभ, शाहरुख आवडतात. भारतीय संस्कृतीची तिला खूप आवड आहे. यामुळेच ती शिक्षणासाठी भारतात आली अन् येथेच जीवनसाथी मिळाला. आता दोन्ही जण वैवाहिक आनंद घेत आहेत. त्यांचा संस्कृती, भाषेची अडचण आली नाही.
कसे झाले प्रेम
इराणमधील हेंगामेह नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. नवी दिल्लीत तिची ओळख केरळमधील विष्णू नावाच्या मुलाशी झाली. दोघे 2017 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. दोन्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांची लव्ह स्टोरी कशी झाली, यासंदर्भात हेंगानेह व विष्णूने व्हिडिओ शेअर केला. त्यात विष्णू म्हणतो की, तो मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये जेवत होता. तेवढ्यात त्याला एका मुलीचा जोरात हसण्याचा आवाज आला.ती सतत हसत होती.
अशी झाली ओळख
विष्णूला ती मुलगी त्याच्याकडे बघून हसतेय, असे वाटले. त्यानंतर जेवण झाल्यावर विष्णू उठला आणि निघू लागला, तेव्हाही ती अनोळखी मुलगी त्याच्याकडे बघून हसत होती. परंतु विष्णूची त्याच्याशी बोलायची हिंमत होत नव्हती. काही वेळाने लाजतच विष्णू तिच्याजवळ गेला अन् तिचे नाव विचारले. तिचे नाव हेंगामेह होते. ती इराणची असल्याचे तिने सांगितले.
विष्णू लाजाळू स्वभावाचा
हेंगमेह म्हणते, त्या दिवशी विष्णू लाजेने लाल झाला होता. तो बोलायला खूप घाबरत होता. तो मला म्हणाला, तुम्ही परदेशातून आला आहात, इथे काही अडचण किंवा गरज असेल तर मला फोन करू शकता. त्यावेळी आमचे नंबर शेअर करण्यात आले. यानंतर विष्णू रोज कॅन्टीनमध्ये भेटू लागला. हळहळू त्यांची मैत्री वाढली.
अन् ती इराणला निघाली
दोघे एकत्र फिरले, जेवण करत होते, पार्टीही केली. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागले. अचानक एके दिवशी हेंगमेहने सांगितले की, ती इराणला जाणार आहे. हे ऐकून विष्णू भावूक झाला. त्याने विचारले – परत येशील का? उत्तर मिळाले- होय, का नाही?.
असं केले प्रपोज
यानंतर हेंगमेह एक महिन्यानंतर परत आली. तेव्हा विष्णूने प्रपोज करायचे होते. परंतु हिंमत होत नव्हती. अखेरी हेंगमेह उघडपणे प्रपोज केले. कारण तिला विष्णूचा लाजाळू स्वभाव समजला होता. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. वेगळ्या संस्कृतीच्या, वेगळ्या देशाचे तुम्ही, तुमच्या भाषाही वेगळ्या…पण आम्ही ठाम होतो. कारण आमचे कुटुंब आमच्यासोबत होते.