Valentine Day 2023 : ‘प्रेमात वेळा’पत्रक पाळावं लागतंय का? प्रेमात वेळकाळ असतो का, पाहा हे शेड्युल

| Updated on: Feb 04, 2023 | 1:59 PM

प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण चांगल्या दिवसाच्या प्रतीक्षेत असतात, त्यामुळे तुमच्या मनातील भावना आवडत्या व्यक्तीकडे व्यक्त करण्याआधी पाहा प्रेमाच्या दिवसांचा वेळापत्रक...

Valentine Day 2023 : प्रेमात वेळापत्रक पाळावं लागतंय का? प्रेमात  वेळकाळ असतो का, पाहा हे शेड्युल
Valentine Day 2023
Follow us on

Valentine’s Calendar 2023 : प्रेम… प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असते. त्या व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त एका निमित्ताची गरज असते. तर फेब्रुवारी महिना प्रेमात अडकलेल्यासाठी प्रचंड खास असतो. एवढंच नाही तर, फेब्रुवारी महिना म्हणजे फक्त प्रेम करण्याचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. फेब्रुवारी महिन्यात आपण आपल्या खास व्यक्तीवर असलेलं प्रेम व्यक्त करतो. म्हणून अनेक जण फेब्रुवारी महिन्याच्या प्रतीक्षेत असतात. ७ फेब्रुवारी पासून ते १४ फेब्रुवारी पर्यंत प्रेमाचा आढवडा साजरा केला जातो. तर आज जाणून घेवू व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात कधी आहे रोज डे, चॉकलेट डे आणि इतर डे…

व्हॅलेंटाईन डेचा आठवडा (Valentine Week List 2023)
७ फेब्रुवारी – रोज डे, गुरुवार
८ फेब्रुवारी – प्रपोज डे, शुक्रवार
९ फेब्रुवारी – चॉकलेट डे, शनिवार
१० फेब्रुवारी – टेडी डे, रविवार
११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे, सोमवार
१२ फेब्रुवारी – हग डे, मंगळवार
१३ फेब्रुवारी – किस डे , बुधवार
१४ फेब्रुवारी – व्हेंलेंटाईन डे , गुरुवार

सांगायचं झालं तर, आपण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे केव्हाही प्रेम व्यक्त करु शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची किंवा महिन्याची गरज नसते. पण फेब्रुवारी महिन्याची गोष्टच वेगळी असते. जर तुम्ही कोणावर प्रेम करत आसला आणि त्या व्यक्तीला तुमच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करत असाल, तर फेब्रुवारी महिन्याचा प्रेमाचा आठवडा प्रचंड खास आहे. जर तुम्ही प्रेमाच्या आठवड्यात योग्य संधी साधून आवडत्या व्यक्तीला प्रपोज केलात, तर ती व्यक्ती देखील प्रचंड आनंदी होईल.

हे सुद्धा वाचा

१४ फेब्रुवारी हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी प्रचंड खास आणि स्पेशल असतो. या दिवशी सर्वत्र आनंद साजरा केला जातो. सर्वप्रथम अमेरिकेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला, त्यानंतर हळू-हळू हा दिवस संपूर्ण जगात साजरा होवू लागला. व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्याची सुरुवात कायम ७ फेब्रुवारी पासून होते आणि १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येतो.

या सात दिवसांत आपण फक्त पर्टनरवर नाही तर, आपल्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तींवर देखील प्रेम व्यक्त करू शकतो.आई, बाबा, भाऊ, बहिण, बेस्टफ्रेंड.. अनेकांवर प्रेमाचा वर्षाव करु शकतो. प्रमेच्या या आठवड्यात अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला खास भेटवस्तू देतात आणि प्रेम व्यक्त करतात.