मुंबईः प्रेमीयुगूलांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine’s Day) हा दिवस अत्यंत खास असतो. आठवडाभर चालत असलेल्या विविध ‘डेज्’चे आपले एक वेगळे महत्त्व असते. शनिवारी सर्वत्र ‘हग डे’ (Hug day) मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अनेकांकडून आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यात येत असलेल्या भेटवस्तूंबाबतही चाचपणी केली जात आहे. आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडीनुसार भेट वस्तू खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच काहींकडून अशा भेटवस्तूंना प्राधान्य देण्यात येत आहे, की जे आपल्या जोडीदाराच्या कायम स्मरणात राहील, किंवा त्याच्या नेहमी वापरात येईल. अनेकदा मनात असा न्यूनगंड असतो की आपण दिलेली भेटवस्तू आपल्या जोडीदाराला आवडेल की नाही, कुठली भेटवस्तू घ्यावी, असे अनेक प्रश्नांची मनात चलबिचल होत असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही गिफ्ट आयडिया (gift ideas) सांगणार आहोत, ज्या तुम्हाला मदत करतील.
‘हग डे’निमित्त तुमच्या जोडीदाराला मिठी मारण्याव्यतिरिक्त तुम्ही खास भेटवस्तू म्हणून मग देऊ शकता. हे सरप्राईज गिफ्ट तुमच्या जोडीदाराला मनापासून आवडेल. मग ही नेहमी वापरात येणारी वस्तू आहे, शिवाय बराच काळ टिकत असल्याने यातून तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतःचा आणि तुमच्या जोडीदाराचा असलेला फोटो मगवर प्रिंट करु शकतात.
स्वत:चा फोटो हा प्रत्येकाला भावत असतोच. त्यात जर कुणी भेटवस्तू म्हणून आपणास फोटो फ्रेम दिली तर यापेक्षा दुसरा आनंद नसतो. ‘हग डे’निमित्त जोडीदाराला मिठी मारून या क्षणाची अनेक छायाचित्रे काढून त्याला संग्रहित करता येते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी जोडीदाराला ‘हग डे’ला काढलेल्या चित्रांची फोटो फ्रेम किंवा कोलाज भेट दिल्यास हे सर्वोत्तम ठरेल. जोडीदारासोबतचे अविस्मरणीय क्षणाची छायाचित्र दिल्याने ते त्याच्या मनाला भावेल.
गेल्या काही वर्षांपासून गिफ्ट देण्यासाठी विविध प्रकारच्या प्रिंटेड उशांची क्रेझ वाढलेली आहे. लव्ह बर्ड, दिल आकारात प्रिंटेड टेक्चर, शेरोशायरीचे विविध संदेश प्रिंट असलेल्या उशांनाही मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे विविध इ- कॉमर्स साइटस्वर या उशा विविध पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी जोडीदाराला या भेटवस्तूचाही विचार करता येतो.
आपल्या जोडीदाराला जर विद्युत रोशणाईबद्दल खास आकर्षण असेल तर एलईडी बाटलीचा विचार तुम्ही करू शकतात. जोडीदाराला त्याच्या रुमसाठी एलईडी बाटली भेट देणेदेखील उत्तम पर्याय आहे. घरातील जुन्या काचेच्या बाटलीत रंगीबेरंगी एलईडी लाईट टाकून आकर्षक भेटवस्तू तयार केली जाऊ शकते.
संबंधित बातम्या
दूर आहात म्हणून काय झालं, जोडीदारासोबत असा साजरा करा ‘हग डे’
Honey | मधाचा गोडवा भावतोय? अतिसेवनामुळे शरीरावर होतात घातक परिणाम..
त्वचेच्या समस्यांवर हे घरगुती उपाय ठरतील लाभदायक, आजच ट्राय करा…