बडीशेपचा चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे खूप कमी लोकांना माहितीये

| Updated on: Dec 05, 2023 | 9:10 PM

बडीशेपची चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यापासून ते डोळ्यांच्या आरोग्यापर्यंत बडीशेपचा चहा फायदेशीर ठरतो. बडीशेप चहा कसा बनवायचा हे जाणून घ्या. सोबत त्याचे फायदे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बडीशेपचा चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे खूप कमी लोकांना माहितीये
tea
Follow us on

Fennel Tea Benefits : बडीशेप एक आयुर्वेदिक औषध आहे. जी आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारच्या आजारांना दूर ठेवते. जेवणानंतर आपल्याकडे बडीशेप खाण्याची सवय आहे. बडीशेर ही थंड आहे. त्याची चव गोड असते. बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि सर्व आवश्यक खनिजे आढळतात, त्यामुळे ती दररोज खालली पाहिजे. पण तुम्हाला बडीशेपची चहा पिण्याचे फायदे माहित आहेत का. चला तर मग जाणून घेऊया.

कसा बनवावा बडीशेपचा चहा?

बडीशेप पाण्यात उकळून मग पाणी गाळून घ्यावे. त्यानंतर त्यात किसलेले आले टाका. चांगले उकळू द्या, नंतर गाळून त्यात मध मिसळून प्या.

बडीशेप चहा पिण्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

बडीशेप पचन प्रक्रिया संतुलित करते, ज्यामुळे शरीरातील चयापचय सुधारते. बडीशेपमध्ये असलेले फायबर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते, त्यामुळे आपण जास्त खाणे टाळतो. या कारणांमुळे बडीशेप वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

डोळ्यांसाठी महत्त्वाचे

बडीशेपमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेल प्रथिनेमुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

उच्च रक्तदाब नियंत्रित करते

बडीशेपमध्ये पोटॅशियम आढळते जे शरीरातील ऍसिड संतुलित करते आणि हृदय गती नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी फायदेशीर

बडीशेपमध्ये फायटोएस्ट्रोजेन आढळते, जे स्तनपान करवण्यास मदत करते. दुधाचे प्रमाण वाढवण्यासोबतच ते बाळाचे वजन वाढवण्यासही उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.

बडीशेपचे इतर फायदे

दम्याच्या रुग्णांसाठी बडीशेप फायदेशीर मानले जाते. बडीशेप कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करते. मासिक वेदना कमी करण्यास मदत करते. उच्च रक्त शर्करा संतुलित करण्यात ही बडीशेप मदत करते. याशिवाय कर्करोग प्रतिबंधित करण्यात आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यातही बडीशेप मदत करते.