हिवाळ्यात जेवणानंतर गुळ खाण्याचे 6 मोठे फायदे खूप कमी लोकांना माहितीये

| Updated on: Dec 28, 2023 | 6:44 PM

benefits of eating jaggery : हिवाळा आला की आपल्या आहारात देखील तसा बदल केला पाहिजे. कारण हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपल्या शरीराला उबदार ठेवणे फार महत्त्वाचे असेत. हिवाळ्यात तुम्ही जेवणानंतर गुळ खावू शकता. जेवल्यानंतर गुळ खाण्याचे काय फायदे असतात जाणून घ्या.

हिवाळ्यात जेवणानंतर गुळ खाण्याचे 6 मोठे फायदे खूप कमी लोकांना माहितीये
jaggery
Follow us on

मुंबई : आजही जुने लोकं जेवण झाल्यानतर गोड म्हणून गूळ खाण्याचा सल्ला देतात. पण आता लोकांना गुळ खायला आवडत नाही. बाजारात अनेक मिठाई, कुकीज आणि चॉकलेट उपलब्ध आहेत जे लोक खाणं पसंत करतात. पण या गोष्टी शरीराला हानिकारक ठरु शकतात. त्यामुळे चॉकलेट किंवा मिठाई खाण्याऐवजी गुळ खालला पाहिजे. हिवाळ्यात गूळ खाणे खूप फायदेशीर असते. गूळ खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. गुळामुळे पचनक्रिया देखील सुधारते.

जेवल्यानंतर गूळ का खावे?

जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. जेवल्यानंतर तर तुम्ही गूळ खात असाल तर यामुळे तुमचे पोट निरोगी राहते. गुळ खाल्याने चेहरा देखील उजळतो. त्यामुळे कोणतंही वय असो गुळ खालला पाहिजे.

गुळ पचनास करते मदत

जेवण झाल्यानंतर जर तुम्ही गूळ खात असाल तर तुमची पचनशक्ती मजबूत होते. ज्या लोकांना गॅस किंवा अपचन याचा त्रास होत असेल तर त्या लोकांना गुळ खालले पाहिजे. गुळामध्ये अनेक पोषक घटक असतात जे पचण्यास मदत करतात.

अॅनिमिया दूर करते

गुळात लोह चांगल्या प्रमाणात आढळते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास अशा व्यक्तींनी गूळ खालला पाहिजे. यामुळे लाल रक्तपेशी वाढतात. हिमोग्लोबिन कमी असल्यास देखील गूळ खाऊ शकता. गुळामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते.

हाडे मजबूत होतात

जेवणानंतर तर तुम्ही दररोज गुळाचे सेवन करत असाल तर यामुळे कॅल्शियमची कमतरता भरून निघते. कॅल्शियममुळेच हाडे मजबूत होतात.

लठ्ठपणा कमी करते

गुळात असलेले पोटॅशियम चयापचय गतिमान करते. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी साखरेपेक्षा गूळ जास्त चांगला.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास देखील मदत होते. गुळात झिंक असते. याशिवाय व्हिटॅमिन सी देखील असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीरात उबदारपणा येतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.