व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स च्या कमतरतेमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका

| Updated on: Oct 08, 2022 | 1:06 PM

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण हृदयरोग हे आहे.

व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स च्या कमतरतेमुळे वाढतो हृदयरोगाचा धोका
Follow us on

फिंगरप्रिंट प्रमाणेच (बोटांचे ठसे) प्रत्येक व्यक्तीची शारीरिक बांधणी आणि त्यांचे डीएनए (DNA) हे पूर्णपणे भिन्न आणि विशेष असतात. कोणतीही दोन हदये (heart) ही एकसारखी नसतात. आणि एकाच कुटुंबातील असूनही व्यक्तींमध्ये शारीरिक आणि अनुवांशिक फरक आढळू शकतात. तसेच हृदयरोगावरील उपचारही प्रत्येक केसमध्ये वेगवेगळे असतात. मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी आणि सामान्य व्यक्तीसाठी मेडिकल प्रोफेशनल्स (medical professional)हे समान व्यायामाचा सल्ला देऊ शकत नाहीत.

हृदय रोग हे वाढत्या मृत्यूस कारणीभूत :

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हृदयरोग (CVD) हे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2019 मध्ये सीव्हीडीमुळे सुमारे 1.79 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला, हा आकडा जगभरातील मृत्यूंपैकी 32 टक्के आहे. यापैकी 85 टक्के मृत्यू हे हार्ट ॲटॅक आणि स्ट्रोकमुळे झाले आहेत. हृदयाचे आरोग्य समजून घ्यायचे असेल तर आपल्याला हृदयविकारही समजून घ्यावा लागेल. हृदयरोग हा हृदयावर परिणाम करणाऱ्या अनेक परिस्थितीबद्दल संदर्भ देते, ज्यामध्ये रक्तवाहिन्यांचा आजार, उदा. कोरोनरी आर्टरी डिसीज, हृदयाचे अनियमित ठोके, जन्मजात हृदय दोष आणि हार्ट व्हॉल्व्ह डिसीज यांचा समावेश आहे. हृदयरोगाशी संबंधित घटकांमध्ये वयाचाही समावेश आहे – कारण रक्तवाहिन्या खराब व अरुंद होण्याची शक्यता तसेच हृदयाचे स्नायू कमकुवत होणे, हे सर्व होण्याची शक्यता वाढत्या वयानुसार वाढत जाते. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. मेनोपॉजनंतर (रजोनिवृत्ती) स्त्रिया कमकुवत होतात आणि हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास असेल तर यामुळे त्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज होण्याचा धोका वाढतो.

हे सुद्धा वाचा

तणावामुळेही वाढू शकतो हृदयरोग :

धूम्रपान, अनहेल्दी खाद्यपदार्थ, हायपरटेन्शन (उच्च रक्तदाब), उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा आणि खराब जीवनशैली या सर्वांचा थेट संबंध हृदयरोगाशी आहे. तणावामुळे धमन्यांचे नुकसान होऊ शकते आणि हृदयरोगही होऊ शकतो. मात्र, तुम्ही सर्व काही व्यवस्थित मॅनेज करत असलात तरीही, केवळ एका विशिष्ट व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हृदयरोगाची शक्यता वाढू शकते.

व्हिटॅमिन बी बजावते महत्वाची भूमिका :

होमोसिस्टीन मेटाबॉलिजम मध्ये बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन हे विशेष भूमिका निभावतात. व्हिटॅमिनची कमतरता असेल तर त्यामुळे होमोसिस्टीनची पातळी वाढते आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. बी व्हिटॅमिन हे होमोसिस्टीनची वाढ नियंत्रित करून, एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. तसेच, यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकतो. व्हिटॅमिन बी12 हे ॲनिमिया झालेल्या रुग्णांना देखील दिले जाते, त्यामुळे रक्ताची गुणवत्ता तसेच आरोग्यही सुधारते.

फॉलिक ॲसिड किंवा बी-कॉम्प्लेक्स ही व्हिटॅमिन्स हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका देखील कमी करू शकतात. एका साधारण बी कॉम्प्लेक्समुळे हृदयविकाराचा झटका टाळता येतो. त्यामुळे बी 12, व्हिटॅमिन डी आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंट्सची नियमित चाचणी करून घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर वेळच्या वेळी योग्य उपचार करता येतील.