Vitamin D : हिवाळ्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्याने व्हिटामिन डी साठी 6 गोष्टींचे करा सेवन

| Updated on: Jan 04, 2024 | 8:41 PM

Vitamin D : व्हिटॅमिन डी मुख्यत: सूर्यप्रकाशापासून मिळते. परंतु थंडीत सूर्यप्रकाश कमी असल्याने व्हिटामिन डी ची शरीरात कमतरता होऊ शकते. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करुन व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढू शकता.

Vitamin D : हिवाळ्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्याने व्हिटामिन डी साठी 6 गोष्टींचे करा सेवन
vitamin D
Follow us on

मुंबई : हिवाळ्यात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात बदलत्या हवामानामुळे अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. उन्हाळ्यात उन्ह कमी पडत असल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता भासू शकते. व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरण आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांना दिवसभर सूर्यप्रकाश मिळत नाही. अशा स्थितीत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा विशेषतः हाडांवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत ही कमतरता भरून काढण्यासाठी काही पदार्थांना आहाराचा भाग बनवू शकता.

मशरूम

मशरूममधून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते. मशरुममुळे शरीराला व्हिटॅमिन डी 2 आणि व्हिटॅमिन डी 3 चांगल्या प्रमाणात मिळते. मशरूम सलाड, सँडविच आणि भाज्यांमध्ये घालूनही खाऊ शकता.

हे सुद्धा वाचा

अंडी

संपूर्ण अंडे खालले तर त्यातून ही शरीराला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळते. व्हिटॅमिन डी व्यतिरिक्त, अंड्यांमध्ये निरोगी चरबी, प्रथिने आणि अमीनो अॅसिड्स चांगल्या प्रमाणात असतात.

चीज

चीजमध्ये देखील तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते. चीजमध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. रोज काही प्रमाणात चीज खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळते.

सोया मिल्क

सोया दूध हा व्हिटॅमिन डीचा वनस्पती-आधारित स्त्रोत आहे. यातून शरीराला केवळ व्हिटॅमिन डीच नाही तर लोह, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि प्रोटीनही मिळते. सोया दुधाशिवाय साध्या दुधातही काही प्रमाणात व्हिटॅमिन डी असते.

मासे

ट्यूना आणि सॅल्मन हे असे मासे आहेत जे शरीराला व्हिटॅमिन डी पुरवतात. या माशांना आहाराचा भाग बनवणे सोपे आहे आणि ते शरीराला व्हिटॅमिन डी तसेच ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वे प्रदान करतात.

व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड अन्न

व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड खरेदी करता येणारे अनेक खाद्यपदार्थ आहेत. व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड दूध, तृणधान्ये, रस आणि दलिया इत्यादी बाजारातून खरेदी करता येतात. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळते.