केस होतील सुंदर, उजळेल चेहऱ्याचा रंग पण कसं? ‘व्हिटॅमिन ई’ कॅप्सूलचा करा योग्य उपयोग

| Updated on: Oct 02, 2024 | 1:44 PM

Health Tips: 'व्हिटॅमिन ई' कॅप्सून ठरेल तुमच्यासाठी लाभदायक, पण कसा कराल वापर? योग्य रित्या वापर केल्यास केस होतील सुंदर आणि उजळेल चेहरा...

केस होतील सुंदर, उजळेल चेहऱ्याचा रंग पण कसं? व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा करा योग्य उपयोग
Follow us on

Health Tips: व्हिटॅमिन ई आरोग्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. व्हिटॅमिन ईचे शरीराला अनेक फायदे होतात. व्हिटॅमिन ई रक्त पेशी वाढवण्याचे काम करते. शिवाय डोळे आणि पेशी निरोगी ठेवण्याचं काम ‘व्हिटॅमिन ई’ करते. म्हणूनच ते केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. निरोगी त्वचा आणि केस मिळविण्यासाठी, बदाम, सूर्यफूल बियाणे, पाइन नट्स, पपई, शिमला मिरची, ऑलिव्ह ऑईल, ऑलिव्ह इत्यादी व्हिटॅमिन ई समृद्ध पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे.

त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केला जातो. व्हिटॅमिन ई केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी एक वरदान आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी, व्हिटॅमिन ई कॅप्सूल कॅप्सूलमध्ये काही घटक मिसळून लावल्यास त्याचा फायदा नक्की दिसून येईल…

त्वचेला होईल व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे फायदा – व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतात आणि आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवते.

चेहऱ्यासाठी कसा कराल व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर – व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर थेट चेहऱ्यावर केला जाऊ शकतो. पण त्वचा संवेदनशिल असेल तर, एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि 25 ते 30 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छा ठेवा. आठवड्यातून दोन वेळा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहरा चमकदार होईल.

केसांसाठी देखील व्हिटॅमिन ई कॅप्सूल फार लाभदायक आहे. केसांची टाळू (स्कॅप्ल) निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई प्रभावी आहे. व्हिटॅमिन ई मुळे केस गळती, कोंडा यांसारख्या अनेक अडचणी दूर होतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे केसांची चमक वाढते.

निरोगी केसांसाठी व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल घ्या आणि त्यात दही आणि अंडी मिसळा आणि केसांना लावा. पहिल्यांदा वापरल्यानंतर तुम्हाला फार मोठा फरक जाणवेल. शिवाय व्हिटॅमिन ई कॅप्सूल खोबरेल तेलात मिसळून केसांना लावता येते. ज्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य निरोगी राहिल.