मुंबई : मऊ, काळेभोर आणि लांबसडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र, पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊन हजारो रूपये खर्च देखील असे केस मिळत नाहीत. त्यामध्ये सध्या अनेक महिला या केस गळतीमुळे त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केस गळती कमी होईल आणि पार्लरमध्ये न जाता आपण घरच्या घरी देखील साधे-सोपे उपाय करू चांगले केस मिळू शकतात. (Vitamin E is beneficial for hair)
त्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई ची मदत घ्यावा लागणार आहे. ‘व्हिटॅमिन ई’मुळे आपले केस मऊ, सुंदर, मजबूत आणि जाड होण्यास मदत मिळते. केसगळती रोखण्यासाठी व्हिटॅमिन ई आणि अंड्याचे हेअर मास्क तयार करा. हे हेअर मास्क अतिशय चांगले आहे आपल्या केसांसाठी आठवड्यातून केवळ दोनदा याचा उपयोग केल्यास तुम्हाला आपल्या केसांमध्ये कमी वेळातच चांगला फरक जाणवेल.व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल, मोहरीचे तेल दोन चमचे आणि दोन अंडी वाटीमध्ये सर्वात अगोदर वर दिलेली सामग्रीचे मिश्रण करून घ्या व पेस्ट तयार करा.
ही पेस्ट 40 ते 50 मिनिटे केसांना लावा. यानंतर शॅम्पूने केस धुऊन घ्या.आवळा एक असा आहे ज्यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर मिळतात. आवळ्यामध्ये जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. रोज आवळा खाल्याने तुम्ही बर्याच आजारांपासून मुक्त होऊ शकता. आवळा हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवळ्याचा रस करून तुम्ही पिऊ शकता किंवा तसाच खाऊ शकतात. जर रोज सकाळी रिकाम्या पोटी आपण कच्चा आवळा खाल्लातर तुम्ही बऱ्याच आजारांपासून दुर राहू शकता.
संबंधित बातम्या :
Skin Care | सकाळी उठताच थंड पाण्याने धुवा चेहरा, चिरकाळ टिकून राहील त्वचेचे तारुण्य!https://t.co/BxDSd3vEDs#beautytips #skincareroutine #ColdWater
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
(Vitamin E is beneficial for hair)