मुंबई : व्हिटॅमिन के आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन के हाडे, हृदयाच्या आरोग्यास आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप आवश्यक असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिन के ची कमतरता झाली तर आपल्याला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. शरीरातील व्हिटॅमिन के कसे वाढेल, यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरामध्ये व्हिटॅमिन केची कमतरता झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात हे आज आपण बघणार आहोत. (Vitamin K deficiency can lead to these problems)
व्हिटॅमिन के शरीरासाठी आवश्यक
व्हिटॅमिन केचे दोन मुख्य प्रकार आहेत – व्हिटॅमिन के 1 (फायलोक्विनॉन), जे पालक सारख्या भाज्यांमधून मिळते आणि व्हिटॅमिन के 2 (मेनॅकॅकिनोन), जे आतड्यांमध्ये नैसर्गिकरित्या तयार होते. आपल्या शरीरात क्लॉटिंग आणि रक्तस्त्राव रोखण्यासाठी प्रामुख्याने या दोन्ही प्रकारचे व्हिटॅमिन आवश्यक असतात. वयस्कर लोकांमध्ये व्हिटॅमिन केची कमतरता असते. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन केची कमतरता होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या आहारात व्हिटॅमिन केचा समावेश नसणे.
जास्त रक्तस्त्राव
व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्त गोठणे कठीण होते, ज्यामुळे जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो. यामुळे गंभीर जखमी झाल्यानंतर मृत्यूचा धोका वाढतो. व्हिटॅमिन केची जास्त कमतरता आपल्या शरीरात ज्यावेळी होते. त्यावेळी आपल्या नाकातून रक्तस्राव होतो.
कमकुवत हाडे
हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन के आवश्यक आहे. काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, व्हिटॅमिन केचे आणि हाडांचे महत्त्वपूर्ण संबंध आहे. व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. यामुळे सांध्या आणि हाड्यांमध्ये वेदना होते.
जखमा होणे
आपल्या शरीरात व्हिटॅमिन के कमतरता असेल तर आपल्याला जखमा लवकर होतात आणि त्यामधून रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो. विशेष म्हणजे या जखमा भरून निघण्यासाठी बराच कालावधी देखील लागतो. काही लोकांच्या नखाखाली लहान रक्त गुठळ्या देखील तयार होतात.
हिरड्यामधून रक्तस्राव
व्हिटॅमिन केची कमतरता असण्याचे महत्वाचे लक्षण म्हणजे, आपल्या हिरड्यांमधून रक्तस्राव होणे. ऑस्टिओकलिन नावाच्या प्रोटीननुसार व्हिटॅमिन के 2 जबाबदार आहे. हे प्रथिने आणि खनिजे दात संक्रमण करतात, ज्यामुळे हिरड्यामधून रक्तस्राव होतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…
आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
(Vitamin K deficiency can lead to these problems)