स्वयंपाक घरातील या गोष्टींचे करा सेवन, उलटी, मळमळ कायमची होईल दूर

| Updated on: Dec 03, 2024 | 3:42 PM

असे काही खाद्यपदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे उलट्या आणि मळमळ होऊ शकते. जर तुम्हाला देखील मळमळ होत असेल तर तुम्ही स्वयंपाक घरातील या गोष्टींचे सेवन करू शकता. ज्यामुळे उलटी आणि मळमळीची समस्या दूर होईल.

स्वयंपाक घरातील या गोष्टींचे करा सेवन, उलटी, मळमळ कायमची होईल दूर
Follow us on

उलट्या होण्यापूर्वी जाणवणारी भावना म्हणजे मळमळ. जर तुम्हाला मळमळ होत असेल तर हे लक्षण आहे की उलटी होणार आहे. मळमळ होण्याची अनेक कारणे आहेत आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ल्यास, प्रवासादरम्यान, काही चुकीचे खाल्ल्यास किंवा दुर्गंधीयुक्त वास येत असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकते. उलटी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही होऊ शकते. मळमळण्याची समस्या तुम्हाला अनेकदा होत असेल तर स्वयंपाक घरातील काही गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे मळमळ होत नाही आणि त्यामुळे उलट्यांपासून देखील बचाव होतो.

आलं

आल्या मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे मळमळण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. अनेक जणांना प्रवासात उलटी होते तुम्हालाही उलटी होत असेल किंवा मळमळ होत असेल तर तुम्ही आले खाऊ शकता. कधीही मळमळ किंवा उलटी होत असेल तर आले पाण्यामध्ये टाकून उकळून पिल्यामुळे उलटी आणि मळमळण्याच्या त्रासापासून आराम मिळेल.

लिंबू पाणी

सकाळी अनेक जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होतो. या वेळेला लिंबू पाणी पिणे फायदेशीर ठरेल. लिंबू पाणी पिल्यामुळे मळमळ थांबते यासोबतच शरीर हायड्रेट होते. त्यामुळे उलट्या झाल्या तरी देखील अस्वस्थता कमी होते आणि शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

बेकिंग सोडा

अर्धा ग्लास पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाकून तोंड धुतल्याने मळमळ उलटी थांबते. मळमळ उलटी मुळे अनेकदा तोंडाची चव खराब होते. पाण्यात बेकिंग सोडा टाकून गुळण्या केल्याने तोंडाची चव सुधारते.

पुदिन्याची पाने

मळमळ होत असल्यास पुदिन्याची पाने खाणे फायदेशीर ठरते. ही पाने खाल्ल्याने उलटी, मळमळ होत नाही. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून चहा प्रमाणे पिता येतात. पुदिनाच्या पाण्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असल्याने हे पाणी पिल्याने पोटाला आराम मिळतो.

दालचिनी

गरम पाणी करून त्यात दालचिनी टाकून पिल्याने उलटी मळमळ थांबते. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. ज्यामुळे उलट्या थांबतात कपभर पाण्यात दालचिनी उकळून त्यात थोडासा मध टाकून पिल्यास उलटी आणि मळमळ्याच्या समस्येपासून आराम मिळेल.