Beauty Tips : निरोगी त्वचेसाठी अक्रोड अत्यंत फायदेशीर, वाचा !

| Updated on: May 14, 2021 | 3:50 PM

क्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते.

Beauty Tips : निरोगी त्वचेसाठी अक्रोड अत्यंत फायदेशीर, वाचा !
अक्रोड
Follow us on

मुंबई : अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. अक्रोड हा सुक्यामेव्यातील असा एक घटक आहे जो आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मिठाईबरोबर अक्रोड अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये देखील वापरला जातो. अक्रोडमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो, जो त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतो. अक्रोड हा स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. ज्याचा वापर केल्याने आपली त्वचा चमकदार दिसते. (Walnut is beneficial for the skin)

मिक्सर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 अक्रोड घाला आणि चांगली बारीक पूड करा. अक्रोड पूड करत असताना लक्षात ठेवा की अक्रोड पूर्ण बारीक न करतात, त्याची जाडसर पूड करा. या पूडमध्ये एक चमचा मध मिसळून त्याचे घट्ट मिश्रण तयार करा. याशिवाय एक ते दोन आवळे बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्या आणि वरील मिश्रणात मिसळा. आवळा त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. हा स्क्रब एका जारमध्ये भरून ठेवू शकता. किमान एक ते दोन महिने हा स्क्रब टिकून राहील.

अक्रोडमध्ये 19 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजदेखील मोठ्या प्रमाणता आढळते. याशिवाय ओमेगा 3, फॅटी अॅसिडस् आणि लिनोलिक अॅसिडदेखील अक्रोद्मध्ये आढळते. अक्रोडचे हे गुणधर्म हृदयाला सुरक्षित ठेवतात. तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, अक्रोडमध्ये लक्षणीय प्रमाणात मेलाटोनिन आढळते, ज्यामुळे झोपेची समस्या दूर होते. जर तुम्हालाही नीट झोप येत नसेल तर, झोपण्यापूर्वी अक्रोड नक्की खा.

अक्रोडाची पावडर घ्या आणि त्यात दुध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 10 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार वाटेल आणि चेहऱ्याचा ग्लो देखील वाढेल. तेलात अक्रोड फ्राय करा त्यात चवीनुसार पिठी साखर घाला. हे दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे कोरडा खोकला नाहीसा होईल. अक्रोडाच्या वाळलेल्या खोडाची साल घ्या, त्याची पावडर करा त्यात चिमूटभर लवंग मिसळून दंत पावडर म्हणून तुम्ही वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Walnut is beneficial for the skin)