मुंबई : ‘गाजर’चा वापर जास्त करून आपण सलादमध्ये करतो. गाजर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. बीटा कॅरोटीन, फायबर, व्हिटामिन के 1, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट्स हे घटक गाजरांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. गाजर आपले वजन कमी करण्यात आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांसह, आपल्याला अनेक आरोग्यविषयक समस्यांपासून दूर ठेवण्यात देखील प्रभावी आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? गाजर फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. (want a natural glow on your face then follow these tips)
त्वचा सुंदर आणि चांगली दिसण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा गाजराचे फेस पॅक लावणे आवश्यक आहे. मध्यम आकाराच्या गाजरांपासून आपण फेस पॅक तयार करू शकता. महिन्याभरात आपण जितके जास्तीत जास्त वेळा या फेस पॅकचा उपयोग कराल, तुमच्या चेहऱ्यावर तितकाच नॅचरल ग्लो येईल.
-गाजराचा फेस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे किसलेले गाजर घ्या अर्धा चमचा दुधाची मलई आणि एक चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर 20 ते 25 मिनिटे ठेवा.
-यानंतर हलक्या हाताने त्वचेचा मसाज करा. थोड्या वेळानं थंड पाण्याने चेहरा आणि मान स्वच्छ धुऊन घ्या. चेहरा धुतल्यानंतर टोनर लावा आणि त्यानंतर मॉइश्चराइझर देखील लावावे. आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा हा उपाय करावा.
-मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी किसलेले गाजर आणि दालचिनीच्या फेस पॅकचा वापर करा. पॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये दोन चमचे किसलेले गाजर आणि चिमूटभर दालचिनीची पावडर, अर्धा चमचा दुधाची मलई आणि एक चमचा गुलाब पाणी एकत्र घ्या.
-चमकदार त्वचेसाठी गाजर आणि गुलाब जलचा फेस पॅकचा वापर करावा. हे पॅक तयार करण्यासाठी दोन चमचे किसलेले गाजर, दीड चमचा गुलाब पाणी आणि एक चमचा बेसन एकत्र घ्या. तिन्ही सामग्री नीट एकजीव करून घ्या. 20 ते 25 मिनिटांसाठी चेहऱ्यावर पॅक लावा.
संबंधित बातम्या
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…https://t.co/pe3zkVHUt4#BlackPepper #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
(want a natural glow on your face then follow these tips)