मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. मात्र, सौंदर्य दोन प्रकारचे असते. एक म्हणजे आंतरीक आणि दुसरे म्हणजे बाह्य सौंदर्य पण जास्त करून लोक बाह्य सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. बाह्य सौंदर्यासाठी ब्यूटी क्रिम आणि औषध देखील वापरतात. (Want beautiful skin, don’t ignore it)
आंतरीक सौंदर्य नेहमासाठी राहते बाह्य सौंदर्यामधून काही दुष्पपरिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जास्तीत जास्त भर हा आंतरीक सौंदर्यावर दिला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती नुस्के सांगणार आहोत.
-जवसाच्या बिया तुम्ही जर आहारात समावेश केला तर ते तुमच्या त्वचेसाठी अत्यंत चांगले आहे. तुम्ही जवसाच्या बिया तशाच कच्चा खाऊ शकतात किंवा जवसाची चटणी देखील करू शकतात. मात्र, दिवसांतून एकदातरी जवस खाल्ले पाहिजे.
-नाचणीमध्ये दही मिसळा नाचणीचे हे मिश्रण चेहर्यावर लावा आणि सुमारे 15 ते 25 मिनिटांनंतर ते पाण्याने धुवा. आपण कधीही हा स्क्रब वापरू शकता. हा स्क्रब तुमची त्वचा एक्सफोलीएट करतो आणि त्वचा मॉइश्चराइझ देखील करतो. स्क्रबमध्ये उपस्थित दही सन टॅन काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, नाचणीमध्ये अमीनो आम्ल असतात, जे आपल्या त्वचेचे कोलेजन वाढवण्यास तसेच, त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात
-चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्रास होत असेल, तर आले आणि मधाची पेस्ट चेहर्यावर लावा. सुमारे 15 ते 20 मिनिटे हा फेस मास्क चेहऱ्यावर लावून ठेवा. मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून किमान 2 वेळा हा फेसपॅक वापरा
-डोळ्यांभोवतालची काळी वर्तुळे अर्थात डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आपण आल्याचा रसाचा वापर करू शकता. आल्याच्या रसाने डोळ्यांखाली मसाज करा. मसाज करताना हा रस आपल्या डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या. रस डोळ्यात गेल्याने डोळ्यांना हानी होणार नाही, मात्र ते चुरचुरू लागतील.
संबंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Want beautiful skin, don’t ignore it)