मुंबई : कोरोना विषाणूची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. हा संसर्ग एकापासून दुसऱ्या ठिकाणी फार लवकर पसरतो. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोरोना आपल्यापासून दूर राहतो. अनेकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध उपायोजना करतात. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास एक पेय सांगणार आहोत. (Watermelon juice is beneficial for boosting the immune system)
जे तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास घेतले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. कलिंगड खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. मात्र, तुम्ही जर सकाळी एक ग्लास कलिंगडाचा रस पिला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोनाच्या काळात स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे.
कलिंगडमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. कलिंगडमध्ये असलेले पाणी आणि फायबर पोट भरण्यास मदत करतात, ज्यामुळे डायट कंट्रोलमध्ये राहते आणि वजन कमी करण्यास ही मदत होते. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते, जे शरीरातील विषारी तत्व बाहेर काढतात. फक्त कलिंगड नाही, तर तर त्यांच्या बिया सुद्धा वजन कमी करण्यास मदत करतात. कलिंगडच्या बियांमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. बियांमध्ये खूप कमी कॅलरीज असतात. जर टरबूजमध्ये 4 ग्रॅम आहे, तर त्यात फक्त 23 कॅलरीज असतात.
-बद्धकोष्ठता आणि गॅस ही एक मोठी समस्या बनली आहे जवळजवळ प्रत्येक माणूस यामुळे त्रस्त आहे. परंतु कलिंगडचे खाल्लाने केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळू शकते. कारण कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते, यामुळे पाचन तंत्रही ठीक राहते आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
संबंधित बातम्या :
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Watermelon juice is beneficial for boosting the immune system)