मुंबई : जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा आपण प्रथम आपल्या आहारात भात कमी करतो. गेल्या काही वर्षांत बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी ब्राउन राइस खातात. ब्राउन राइसमध्ये बरेच पौष्टिक घटक असतात जे आपले वजन नियंत्रित करण्यासाठी कार्य करतात. जर आपल्याही वजन कमी करायचे असेल तर ब्राउन राइस तुम्ही खाऊ शकतात यामुळे तुमचे वजन काढत नाही तर कमी होण्यास मदत होते. (Weight loss tips eat these 2 type of rice for weight loss)
कार्बोहायड्रेट प्रोटीनच्या तुलनेत शरीराला लवकर उर्जा प्रदान करतात. याची व्यायामावेळी अधिक आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट मांसपेशींमध्ये ग्लायकोजनची गरज भरुन काढण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आहारात ब्राउन राइस यासारख्या पदार्थांचं सेवन करणं महत्त्वाचं ठरतं.
-पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते. यामुळे ब्रोउन राइस खाल्लातरी आपले वजन वाढत नाही.
-पांढर्या तांदळापेक्षा ब्राउन राइसमध्ये आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, ब्राउन राइसपेक्षाही क्विनोआ राइस आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. ब्राउन राइसमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. क्विनोआ राइस रक्तदाब कमी करण्यास मदत करते. ब्राउन राइसमध्ये क्विनोआसारखे कमी ग्लाइसेमिक इंडेक्स आहेत. क्विनोआ राइस खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाहीतर बऱ्याचवेळ पोट भरल्या सारखे वाटते.
-जीवनसत्वे आणि खनिजे ब्राउन राइस थायमिन, निअॅसिन, जीवनसत्व बी-6, मँगेनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह 2, जस्त इत्यादी घटक ब्राउन राइसमध्ये असतात. जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. यामुळे आहारामध्ये पांढऱ्या तांदळाच्या भातापेक्षाब्राउन राइस खाणे फायदेशीर आहे. कारण ब्राउन राइसने वजन देखील वाढत नाही.
संबंधित बातम्या :
Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Immunity Booster | थंडीच्या काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि इम्युनिटी वाढवा!https://t.co/OaOpxZW9YG#immunityboosters #VitaminC #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
(Weight loss tips eat these 2 type of rice for weight loss)