मुंबई: प्रत्येक ऋतूत त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. अशावेळी त्वचेला नीट मॉइश्चरायझ करणं गरजेचं आहे. पण अनेकांची त्वचा कोरडी पडण्याचे कारण म्हणजे प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि योग्य स्किनकेअर रुटीन न पाळणे. त्याचबरोबर चुकीच्या सवयींमुळे अनेकदा त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. अशावेळी मॉइश्चरायझरचा वापर केला तरी त्याचा काही विशेष परिणाम होणार नाही. त्यामुळे आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपली त्वचा खराब होत आहे हे जाणून घेणे चांगले.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचा सर्व थकवा दूर होतो. पण गरम पाण्याच्या वापरामुळे तुमची त्वचा खराब होते. या गरम पाण्यामुळे तुमच्या त्वचेतील तेल आणि ओलावा दूर होतो आणि त्वचा कोरडी होते. त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी किंवा आंघोळीत थंड पाण्याचा वापर करावा.
तुमच्या चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक असते. टॉवेलचा योग्य वापर केला नाही तर चेहऱ्याची त्वचा लाल होईल इतकंच नाही तर टॉवेल चेहऱ्यावर चोळल्यास तुमची त्वचा कोरडी होते.
जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पाणी प्यायले तर ते देखील तुमचे नुकसान करू शकते. जास्त पाणी प्यायल्याने तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते.