गेल्या 2 वर्षांपासून लोकांचा लठ्ठपणा प्रचंड वाढला आहे कारण कोरोना व्हायरस महामारीनंतर लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे लोकांच्या शारीरिक हालचाली मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आता वाढत्या वजनाने त्रस्त झालेले लोक जिममध्ये जाऊ लागले आहेत. अशा वेळी जर कोणी झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त व्यायाम करत असेल तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?फिटनेस मिळवण्यासाठी हेल्दी डाएटसोबत रोजचा व्यायामही महत्त्वाचा असतो, पण विचार न करता वर्कआऊट केल्यास तोही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जिममध्ये व्यायाम करताना आपण कोणत्या चुका करतो?
हे लक्षात ठेवा की ओव्हर एक्सरसाइज अशा लोकांसाठी धोकादायक आहे ज्यांना हे करण्याची सवय नाही आणि ज्यांनी अलीकडेच वर्कआउट करण्यास सुरवात केली आहे. यामुळे व्हेंटिलेशन चा प्रोब्लेम होऊन अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो
आपल्या लक्षात आले असेल की काही लोक जिममध्ये वेट ट्रेनिंग दरम्यान जड वजन उचलण्यास सुरवात करतात, यामुळे स्पिन डिस्क स्लिप होण्याचा धोका निर्माण होतो, ज्याला ‘प्रोलॅप्स्ड इंटरवर्टेब्रल डिस्क’ किंवा स्लिप डिस्क देखील म्हणतात.
सामान्यत: जे लोक जास्त लठ्ठ असतात ते जास्त व्यायाम करण्यास सुरवात करतात कारण त्यांना शक्य तितक्या लवकर वजन कमी करायचे असते. हे खूप धोकादायक आहे कारण त्याचे शरीर इतकी कसरत सहन करण्यास तयार नाही, ज्यामुळे कार्डियाक अरेस्ट आणि ब्रेन हॅमरेज होऊ शकते.
ज्यांना फिटनेस मिळवण्यासाठी व्यायामाचा आधार घ्यावा लागतो, त्यांनी कोणत्याही तज्ज्ञ किंवा ट्रेनरशिवाय कोणतीही कसरत करू नये. एका व्यायामात आणि दुसऱ्या व्यायामात 2 ते 3 मिनिटांचे अंतर ठेवा, यामुळे हृदयाला थोडा आराम मिळतो आणि धोका टळतो.
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)