मुंबई : डिस्लेक्सिया एक मानसिक आजार आहे. हा आजार साधारपणे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. या आजारात रुग्णाला वाचन, लिखाण आणि शब्दांचा उच्चार करण्यास, लक्षात ठेवण्यास त्रास होतो. डिस्लेक्सिया कितीही वयोगटाच्या व्यक्तीला होऊ शकतो. मात्र, लहान मुलांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आढळतं (what is dyslexia disease).
जगातील मोठमोठ्या, दिग्गज व्यक्तींनाही या आजाराने ग्रासलं होतं. टेलिफोनचे निर्माता अलेक्झांडर ग्राहम बेल आणि ज्येष्ठ वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनादेखील डिस्लेक्सिया आजाराने ग्रासले होते. मात्र, या आजाराला नियंत्रणात ठेवण्यात ते यशस्वी ठरले होते.
भारतात जवळपास 3 कोटी पेक्षा जास्त लहान मुलं डिस्लेक्सिया आजाराने पीडित आहेत. बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कित्येक चित्रपट डिस्लेक्सिया संबंधित आहेत (what is dyslexia disease).
डिस्लेक्सिया नेमका आहे तरी काय?
डिस्लेक्सिया हा एक मानसिक आजार आहे. या आजाराचा संबंध थेट मेंदूशी असतो. बऱ्याचदा हा आजार अनुवंशिकही असतो. डिस्लेक्सिया आजार तीन प्रकारचा आहे. पहिल्या प्रकारात रुग्णाला वाचन आणि लिखाण करण्यात अडचण येते. दुसऱ्या प्रकारात गर्भातील मुलाच्या मेंदूचा विकास होत नाही. तर तिसऱ्या प्रकारात मेंदूला गंभीर जखम झाल्याने या आजाराची लागण होते.
डिस्लेक्सियाचे लक्षणं काय?
1) वाचन, लिखाण करण्यात अडचण येणे
2) कोणतीही गोष्ट समजण्यात आणि लक्षात ठेवण्यात अडचण येणे
3) दुसरी भाषा शिकण्यात अडचण येणे
4) कठीण शब्दांचा उच्चार करण्यात अडचण येणे
डिस्लेक्सिया हा अनुवंशिक आजारही आहे. हा आजार जर अनुवंशिक असला तर उपचार करायला अडचणी येतात. पण, या आजाराचे प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्यावर यशस्वीरित्या उपचार करता येऊ शकतो. मात्र, याकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे या आजाराचे प्राथमिक लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा : केसगळती आणि डँड्रफचा वैताग आलाय?, मग ‘ही’ भन्नाट युक्ती वापरा