मुंबई : सध्याच्या काळात लहान वयातच केस पांढरे (White Hair) होण्याची समस्या सामान्य झाली आहे. तरूण वयात केस पांढरे झाल्याने, तुमचा संपूर्ण लुकच खराब दिसतो. ज्यामुळे तुम्ही वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागता. अशा परिस्थितीत लोक पांढरे केस लपवण्यासाठी मेंदी आणि किंवा रंग वापरतात. ज्याचे दुष्परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतात. आजकाल बाजारात येणारी मेंदी ही केमिकलयुक्त (Henna is chemical) असते. ज्यामुळे तुमचे केस कोरडे होतात. त्याच वेळी, डाय तुमचे केस अधिक लवकर पांढरे करतात. अशा परिस्थितीत, या समस्येवर नियंत्रण (Control the problem) ठेवण्यासाठी, त्याचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून केस पांढरे होण्यापासून रोखता येईल. जाणून घ्या, केस पांढरे होण्याची कारणे आणि केसांना आवश्यक पोषण देण्यासोबतच पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरणारे सोपे उपाय.
आजच्या काळात आपला चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली हे केस पांढरे होण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूडच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत, त्यामुळे केसांची मुळे काळी पडणारे मेलेनिन रंगद्रव्य कमी होऊ लागते. याशिवाय झोप न लागणे, अति ताणतणाव, प्रदूषण आदींमुळे मेलेनिन रंगद्रव्यावरही परिणाम होतो. त्यामुळे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात.
कढीपत्ता : कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला मानला जातो. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आणि ते दीर्घकाळ काळे ठेवण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. तुम्ही कढीपत्त्याची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. यासाठी कढीपत्ता धुवून बारीक करावा. या पेस्टमध्ये दही मिसळा आणि केसांना लावा. साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. त्यानंतर केस धुवावेत. हे आठवड्यातून दोनदा करा. यामुळे तुमचे केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबेल.
बटाट्याची साले : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही अनेकदा कचर्यात टाकलेल्या बटाट्याच्या सालीचा तुम्हाला खूप उपयोग होतो. यासाठी बटाट्याची साले एक कप थंड पाण्यात अर्धा तास ठेवा. यानंतर पाणी उकळा आणि थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. थंड झाल्यावर हे पाणी केसांना लावून मसाज करा. साधारण दोन तास केस असेच राहू द्या. त्यानंतर केस धुवावेत. असे आठवड्यातून दोनदा केले तर खूप फरक दिसेल.
केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी या उपायांसोबतच काही गोष्टींचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.
(या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे अनुसरण करा.)