आपण जेव्हा नवीन फोन विकत घेतो तेव्हा आपण पहिल्यांदा फोनसाठी नवीन कव्हर घेतो. कारण आपला फोन सुरक्षित राहावा यासाठी. जवळपास 90% लोक तरी असच करतात. पण तुम्हाला माहितीये का अनेक अब्जोपती फोनला कधीच कव्हर लावत नाही. यात एलॉन मस्क,मार्क झुकरबर्ग सारखे अनेक बड्या लोकांचा समावेश आहे.
अब्जोपती फोनला कव्हर का लावत नाही?
आपण नेहमी अशा बड्या आणि यशस्वी लोकांचे फंडे फॉलो करण्यासाठी प्रयत्न करतो कारण आपल्याला त्यांच्या सवयी आणि त्यांच्या मुल्यांवर तेवढा विश्वास असतो. पण आपण कधी या गोष्टीकडे कदाचित लक्ष दिलं नसेल की हे लोकं त्यांच्या मोबाईलला कव्हर घालत नाही. त्यांच्याकडे तर एवढे महागडे मोबाईल असूनही ते फोनला कव्हर का घालत नाही असा प्रश्न पडला असेल ना?
तर याचे उत्तर अतिशय इंट्रेस्टींग आहे. तुम्हाला जेव्हा याबद्दल समजेल ना तेव्हा तुम्ही स्वत:च तुमच्या मोबाईलचे कव्हर काढून फेकून द्याल. चला जाणून घेऊयात की फोनला कव्हर न घालण्याचं नेमकं कारण काय आहे ते.
फोनला कव्हर मोबाईलसाठी धोकादायक
फोनला कव्हर घातल्याने मोबाईलसाठी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करु शकते. हे खूप कमी लोकांना माहित असेल. होय, फोनचं कव्हर हे प्रत्येकवेळी फायदेशीर ठरत असं नाही. कव्हर लावल्याने फोन लवकर गरम होतो. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्सवरही त्याचा परिणाम होतो. पण जर फोनला कव्हर नसेल तर फोन कूल राहतो आणि चांगला परफॉर्मन करतो.
नेटवर्क इश्यू येण्याची समस्या
फोन कव्हर नसेल तर फोनचा लूकही छान आणि वापरायला हलका वाटतो. तसेच फोन कव्हरमुळे एंटिना बॅंड लॉक होऊ शकतात. यामुळे नेटवर्क इश्यू येऊ शकतो. पण जर कव्हर नसेल तर फोनला चांगले नेटवर्कही मिळते. त्यामुळे तुम्हाला जर नेटवर्क इश्यू येत असेल तर एकदा फोनचा कव्हर नक्की काढून ट्राय करा.
चार्जिंगमध्येही प्रॉब्लम येण्याची शक्यता
एवढच नाही तर काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की, फोनवरील कव्हरमुळे त्याच्या चार्जिंगमध्येही प्रॉब्लम येतात. असं म्हटलं जातं की, फोन गरम होतो तेव्हा तो नीट चार्ज होऊ शकत नाही. तसेच तुम्ही चांगल्या क्वालिटीचा कव्हर लावला नसेल तर बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो. याशिवाय तुमचे कव्हर मॅग्नेटिक असेल तर त्यामुळे जीपीएस आणि Compass ही समस्या निर्माण होतात.
तुम्हाला फोनला स्क्रॅचपासून वाचवण्यासाठी कव्हर लावायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट करा. चार्जिंग करताना कव्हर काढून टाका. याशिवाय गेम खेळतानाही फोनवर कव्हर लावू नका तसेच जमल्यास फोनवर बोलताना तर नेटवर्क इश्यू येत असेल तर एकदा कव्हर काढून नक्की ट्राय करा.