अरेंज मॅरेज (Arrange Marriage) ही पद्धतच पूर्णपणे वेगळी असते. या पद्धतीमध्ये तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला भेटतात ज्याला भूतकाळात कधीच पाहिले सुद्धा नसते अशा व्यक्तीला तुम्हाला जोडीदार म्हणून पसंत करावे लागते. आणि अशावेळी त्याला किंवा तिला पाहिल्यानंतर तुमच्या पालकांना काही वेळातच तो मला होकार द्यावा लागतो जेणेकरून पुढील सगळ्या चालीरीती व बोलणी करायला आपले पालक मोकळे होऊन जातात. अशा वेळी काही जण लगेच हो म्हणतात तर काही जण वेळ घेण्यात माहीर ठरतात परंतु अनेकदा प्रश्न निर्माण होतो की लोक अरेंज मॅरेजला लवकर कसे मान्य करतात जर तुमच्या मनात सुद्धा प्रश्न आला असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी त्यामागील इंटरेस्टिंग सत्य घेऊन आलेलो आहोत.
अश्यावेळी scoopwhoop ने नुकत्याच केलेल्या संशोधनात त्यांनी या अरेंज मॅरेजबद्दल नेमके काय असे कारण आहे की जी तरुण पिढी कोणताही विचार न करता थेट हो म्हणून देते तसेच आजची मॉडर्न असलेली युवा मंडळी,विचाराने बोल्ड असलेले त्यांचे विचार अचानक जेव्हा अरेंज मॅरेजचा विषय निघतो तेव्हा अचानक का बदलून जातात तसेच या मागे असे काय सत्य आहे जे त्यांना होकार देण्यास भाग पडते?.चला तर मग जाणून घेऊया काही “हो” म्हणण्याची कारणे…
scoopwhoopने अनेकांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा अनेक जोडप्यानी अरेंज मॅरेजला हो का दिला? याबद्दलची सविस्तर माहिती दिलखुलासपणे सांगितले यातील काही निवडक अनुभव तुमच्या समोर मांडत आहोत.
याकरिता कळवला “होकार”…..
मी हो म्हणालो कारण आम्हा दोघांना भारतातच राहायचे होते आणि बाहेरगावी जाऊन तिथे राहण्याचा आमचा मानस सुद्धा नव्हता. आम्ही एकमेकांना पाहिले अँड मला माझी होणारी पत्नी आवडली तर होकार दिला..
सुरुवातीला आम्ही 4 महिने एकमेकांना भेटलो चांगल्या गप्पा मारल्या. मी होकार दिला कारण आमची मते एकमेकांच्या विचारसरणीशी जुळत होती. जर आमच्यात काही जमले नाही तर नकार द्यायचा असे ठरले सुद्धा होते पण नंतर सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आमची स्वतंत्र विचारसरणी आणि आमची स्पेस यामुळे आम्ही एकमेकांना होकार दिला.
अरेंज मॅरेज बोलणीवेळी मला काही वेगळे वाटले नाही.आम्ही दोघेच एकांतात बोलण्यासाठी गॅलरीमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर एकमेकांशी मनमोकळे बोलू लागलो. दोघे बोलत असताना आम्हाला कुठेच आम्ही अनोळखी आहेत असे जाणवले नाही उलट गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत अशीच भावना येत होती. दोघांचे स्वभाव आम्हाला चांगले वाटले आणि कालांतराने भेटीगाठी होत गेल्या आणि आज आमच्या लग्नाला एकंदरीत पंधरा वर्षे झाली आहेत म्हणूनच मला तरी नकार देण्यासारखे असे कोणतेही कारण अरेंज मॅरेजमध्ये वाटले नाही.
माझ्या बाबतीत विशेष असे काही होकार बद्दल विचारण्यात आले नव्हते आणि माझ्या आई-वडिलांना हे लग्न मी करायला हवे होते आणि अशा वेळी तेव्हा फक्त मी वीस वर्षाची होती वयाच्या विसाव्या वर्षी माझे हृदय हे एखाद्या मुक्तछंद पक्षाप्रमाणे उडान घेण्यासाठी बाहेर पडणार तितक्यात आई-वडिलांनी स्थळ आणले होते त्यांना मी होकार दर्शवला कारण की मुलगा चांगला होता परंतु त्याला मी का होकार दिला याचे कारण अजूनही मला कळले नाही परंतु आज मी त्याच्यासोबत आनंदी आहे.
मी माझ्या पतीला भारत मेट्रोमनी साईट वर भेटली होती. आम्ही सुरुवातीला चॅटिंग करायचो त्यानंतर मेसेंजर वर भेटू लागलो नंतर खूप वेळ गप्पा मध्ये जाऊ लागला. दिवसेंदिवस भेटी गाठी वाढू लागल्या आणि त्यानंतर त्याचा स्वभाव मला आवडू लागला तसेच जेव्हा मी त्याला काहीतरी समजून सांगत असे तेव्हा तो त्याच एकाग्र पद्धतीने ऐकत असे आणि माझे प्रत्येक म्हणण्याला आदर सुद्धा देत असे आणि मनामध्ये वाटायचे की हाच जो व्यक्ती आहे जो आपल्यासाठी बनवला गेला आहे आणि अशा वेळी त्याने मला विचारले असताप त्वरित मी त्याला होकार सुद्धा दिला..
आता एकंदरीत तुम्हाला वरील माहितीनुसार अंदाज आला असेल की अनेक भारतीय मंडळी अरेंज मॅरेज ला का होकार देतात. मित्रांनो लग्न कोणतेही असो त्यात तुमच्या हृदयाची साथ असणे गरजेच आहे. तुमच्यात संवाद महत्त्वाचा आहे. जर तुमचे नात्यांमध्ये संवाद आणि प्रेम चांगले असेल तर कोणत्याही प्रकारचे मॅरेज तुमच्यासाठी यशस्वी ठरते. जर तुम्ही सुद्धा अरेंज मॅरेज करत करू इच्छित असाल तर आजची माहिती तुमच्या साठी काही प्रमाणात तरी उपयुक्त ठरू शकेल.