Benifits of Custard Apple : हिवाळ्यात सीताफळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. सीताफळ आरोग्यासाठी ही फायदेशीर असते. सीताफळ खूपच चविष्ट लागते. सीताफळ हे पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतात. सीताफळ खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. सीताफळ पचनासाठी चांगले असते. हिवाळ्यात सीताफळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे फुफ्फुसातील ऍलर्जी आणि सूज येण्याची समस्याही कमी होऊ शकते. जाणून घ्या सीताफळचे फायदे.
सीताफळ हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी सीताफळ खा. यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते.
सीताफळमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. ज्यांना अशक्तपणाची समस्या असेल त्यांनी सीताफळचे सेवन करावे. सीताफळचा शेक बनवून देखील पिऊ शकता.
सीताफळ खाल्ल्याने अॅलर्जीची समस्या दूर होऊ शकते. अस्थमाच्या रुग्णांनाही सीताफळ खाण्याचा सल्ला दिला जातो. सीताफळमुळे फुफ्फुसातील सूज कमी होते आणि अॅलर्जी कमी होण्यासही मदत होते. सीताफळमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात.
सीताफळ हे हृदयासाठी फायदेशीर आहे. सीताफळच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. सीताफळमध्ये व्हिटॅमिन बी 6 चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. हृदयरोग टाळण्यासाठी सीताफळचा आहारात समावेश करा.
सीताफळ खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. सीताफळमुळे शरीराला ऊर्जा मिळते. सीताफळ खाल्ल्याने वजनही वाढू लागते. थकवा आणि अशक्तपणा असल्यास सीताफळ खावे.