हिवाळ्यात का दिला जातो खजूर खाण्याचा सल्ला, जाणून घ्या त्याचे फायदे

| Updated on: Nov 21, 2023 | 5:11 PM

Khajoor Benefits: खजुर खायला अनेकांना आवडते. खजूर खाण्यासाठी खूपच गोड असतात. पण मधुमेहाच्या रुग्णांना खजुर खावे की न खावे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. खजूर खाल्ल्याने त्याचे काय फायदे होतात. हिवाळ्यात खजूर खाण्याचा सल्ला का दिला जातो. जाणून घ्या.

हिवाळ्यात का दिला जातो खजूर खाण्याचा सल्ला, जाणून घ्या त्याचे फायदे
Follow us on

Khajoor Benefits : हिवाळ्यात सुक्या मेव्याचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. सोबतच सुक्या मेव्यापासून बनवलेला हलवा किंवा लाडू याचे सेवन केले जाते. सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. थंडीत शरीरात उष्णता ठिकवण्यासाठी त्याचे सेवन केले जाते. खजूर हे हिवाळ्यात खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात खजूर खाल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात ते सांगणार आहोत.

रक्तदाब नियंत्रित करतो

हिवाळ्यात तापमान कमी असल्याने रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे शरीरात रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. अशा स्थितीत रक्तदाब वाढतो. हिवाळ्यात उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूरमध्ये पोटॅशियम भरपूर असते.

मधुमेह नियंत्रणात ठेवते

हिवाळ्यात काही गोड खाण्याची इच्छा अनेकांना होते. पण डायबेटीजचे रुग्ण गोड खाऊ शकत नाही. कारण त्यामुळे साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. पण खजूर हे असे ड्रायफ्रूट आहे ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खजूर खूप फायदेशीर आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे.

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

हिवाळ्यात सर्दी आणि खोकला होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या ऋतूत खजूर भिजवून खाल्याने किंवा दुधासोबत देखील खाल्ल्यास सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते. खजुरमध्ये  अनेक पोषक घटक असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

आतड्याच्या हालचालींना मदत करते

खजुरमध्ये फायबरचे प्रमाण खूप अधिक असते. अशा लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते जे अनियमित मलविसर्जनामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. खजुरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आपल्या शरीराला अनेक समस्यांमध्ये मदत करते.

खजूर नियमित खाल्यास त्यामुळे अल्झायमर सारख्या मेंदूच्या झीज होण्याचा धोका कमी करण्यात मदत होते. खजूरमुळे मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या प्लेक्सचे उत्पादन कमी होते.