मुंबई : गेल्या एका वर्षात भारतात हृदयविकाराच्या घटनांनी भीतीचे वातावरण तयार केले आहे. भारतात तरुण वयातही लोकांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमवावा लागत आहे. अगदी वयाच्या 12 व्या वर्षीही मुलांना हृदयविकाराचा झटका आला आहे कोरोनानंतर हृदयविकारांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. हृदयरोग ही जागतिक समस्या बनली आहे. काही वर्षांपूर्वी तो फक्त वृद्ध व्यक्तींमध्ये दिसत होता. पण आता तरुण वयातही लोकांना जीव गमवावा लागला आहे.
कोविड-19 नंतर जीवनशैलीवर वाईट परिणाम झाला आहे. असं तज्ज्ञांचं मत आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, नैराश्य, खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हा आजार वाढत आहे. फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने 32,457 लोकांचा मृत्यू झाला आहे. जे गेल्या 28,413 मृत्यूंची नोंद झाली होती. कोरोना महामारीचा हृदयाच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडला आहे.
जास्त मिठाचा आहार, धुम्रपान, ताणतणाव, निष्क्रिय जीवनशैली, कमी झोप, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन यामुळे लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला आहे. लोकं आता प्री-डायबिटीज, प्री-हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाचे शिकार देखील होत आहेत.
शारीरिक हालचाली किंवा व्यायामाचा अभाव यामुळे देखील हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, धूम्रपान, तणाव, निष्क्रिय जीवनशैली यासारखे रुग्णांमध्ये जोखीम आणखी वाढते.
भारतीय खाद्यपदार्थांचा दर्जा देखील खालावत चालला आहे. वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असलेले अन्न लोकं खात आहेत. प्रक्रियाकृत कर्बोदकांमधे आणि चरबीने समृद्ध अन्न यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.
जास्त काम किंवा अधिक व्यायामामुळे हृदयावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. हृदयरोग टाळण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान टाळले पाहिजे. तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. मांसाहाराऐवजी अधिक वनस्पती आधारित आहार घ्या. सक्रिय रहा आणि नियमित व्यायामाची सवय लावा.