गरोदरपणात स्त्रीयांच्या शरीरात बरेच बदल होतात. ‘स्ट्रेच मार्क्स’ (Stretch Marks) देखील याच बदलांचा एक भाग आहेत. स्ट्रेच मार्क्स म्हणजे त्वचा ताणली जाण्याच्या खुणा. शरीराच्या कोणत्याही भागावर स्ट्रेच मार्क्स पडू शकतात. परंतु, बहुतेक वेळा ते ओटीपोटाच्या खालच्या भागात, पार्श्वभाग, मांडी आणि स्तनांवर दिसतात. गर्भावस्थेदरम्यान सहसा दुसऱ्या तिमाहीत स्ट्रेच मार्क्स येतात. गर्भधारणेदरम्यान पोट वाढल्यामुळे केवळ आपल्या पोटाच्या त्वचेचा वरचा थरच वाढत नाही, तर खालचा थर देखील ओढला जातो. यामुळे त्वचेतील कोलेजन थोडासा तुटतो आणि यालाच स्ट्रेच मार्क्स म्हणून पाहिलं जातं. स्ट्रेच मार्क्सबद्दल महिलांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. (Pregnancy Stretch Marks)
फक्त जास्त वजन असलेल्या स्त्रियांना स्ट्रेच मार्क्स होऊ शकतात
जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त जास्त वजन असलेल्या महिलांना स्ट्रेच मार्क्स येतात तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कमी बीएमआय असलेल्या महिलांनाही स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात. कारण स्ट्रेच मार्क्स आनुवंशिकतेमुळेही येतात. पण हो, जास्त वजन असलेल्या महिलांना स्ट्रेच मार्क्स होण्याची जास्त शक्यता असते.
रोज तेल लावल्याने स्ट्रेच मार्क्स येत नाहीत
काही महिलांचा असा विश्वास आहे की गरोदरपणात शरीरावर तेल किंवा लोशन नियमितपणे लावल्यास स्ट्रेच मार्क्सची समस्या टाळता येते. पण हे खरे नाही. गरोदरपणात स्ट्रेच मार्क्स हार्मोनल बदलांमुळे होतात, त्यांना काहीही लावून थांबवता येत नाही.
स्ट्रेच मार्क्स कधीच जात नाहीत
असं नाही, गर्भधारणेनंतर शरीरातील हार्मोन्सची पातळी हळूहळू संतुलित होऊ लागते. त्वचेला नियमितपणे मॉईश्चराइज करा, खोबरेल तेल लावा. त्यामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात. याशिवाय आजकाल लेझर थेरपी, ओझोन थेरपी देखील उपलब्ध आहे, ज्यातून हे स्ट्रेच मार्क्स काढता येतात.
हे उपाय करा
प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. याशिवाय टरबूज, काकडी, दुधी यांचं सेवन करावं. खोबरेल तेलाने हलक्या हाताने मसाज करावं आणि वजनावर नियंत्रण ठेवावं.
हेही वाचा:
होळीसाठी बनवा नैसर्गिक रंग घरच्या घरी, ज्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही तर फायदेच होतील…
व्यायामामुळे शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होतील हे सकारात्मक बदल